Guruvayoor Ambalanadayil Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर (Box Office) मागील आठवड्यात 16 आणि 17 मे 2024 रोजी चार चित्रपट रिलीज झाले. यातील तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झालेले आहेत. तर 16 मे 2024 रोजी एक चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे पृथ्वीराज सुकुमारनचा (Prithviraj Sukumaran) 'गुरुवायुरम्बाला नदायिल' (Guruvayoor Ambalanadayil) आहे. 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसांतच 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. प्रमोशन आणि चर्चा नसूनही 'गुरुवायुरम्बाला नदायिल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे.
'गुरुवायुरम्बाला नदायिल' हा चित्रपट 16 मे 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे. विपिन दासने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'गुरुवायुरम्बाला नदायिल' या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, अनसवरा राजन, बासिल जोजफ आणि ममिथा बैजू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका मुलाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची समीक्षा करणाऱ्यांपासून ते सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत सर्वांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे.
'गुरुबायुरम्बाला नदायिल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Guruvayoor Ambalanadayil Box Office Collection Day 5)
'गुरुबायुरम्बाला नदायिल' या चित्रपटाने ओपनिंग डेला अर्थात रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.7 कोटींची धमाकेदार कमाई केली. दुसऱ्या दिवशी 3.8 कोटी, तिसऱ्या दिवशी 5 कोटी आणि चौथ्या दिवशी 6.4 कोटींची कमाई केली. तर पाचव्या दिवशी 3.10 कोटींची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. फक्त देशभरात नव्हे तर जगभरात या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आयपीएल (IPL) आणि 'लोकसभा निवडणुक 2024'ची (Lok Sabha Election 2024) धामधूम असतानाही चित्रपट चांगला गल्ला जमवत आहे. या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल.
पृथ्वीराजने राजकुमारला टाकलं मागे
राजकुमार रावचा (Rajkummar Rao) 'श्रीकांत' (Srikanth) हा चित्रपट 10 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या 12 दिवसांत या चित्रपटाने 28.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पृथ्वीराजने राजकुमारला मागे टाकलं असल्याचं म्हटलं जात आहे. 'श्रीकांत' या चित्रपटाची 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली होती. तुषार हीरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात राजुकमारसह ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
संबंधित बातम्या