अहमदाबाद : आयपीएल 2024 (IPL 2024) ची प्लेऑफची पहिली लढत नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादला  (Sun Risers Hyderabad)पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मिशेल स्टार्क, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर आणि रहमानउल्लाह गुरबाज हे केकेआरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. केकेआरनं पहिल्या ओव्हरपासून मॅचवर वर्चस्व मिळवलं होतं ते त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवलं. केकेआरनं तब्बल 8 विकेटनं सनरायजर्स हैदराबादला 14 व्या ओव्हरमध्येच पराभूत केलं. केकेआरचा संघमालक शाहरुख खान देखील यावेळी अहमदाबादच्या स्टेडियमवर उपस्थित होता. केकेआरच्या विजयाचा शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) आनंद साजरा केला. मैदानावर फेरी मारत शाहरुख खाननं अहमदाबादच्या प्रेक्षकांना अभिवादन केलं. यावेळी एक भलताच प्रसंग घडला. शाहरुख खाननं आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेलला सॉरी म्हटलं. 


नेमकं काय घडलं?


केकेआरनं विजय मिळवल्यानंतर आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल यांचा स्टेडियमवरुन शो सुरु होता. शाहरुख खान प्रेक्षकांना अभिवादन करत पुढे येत होता. आकाश चोप्रा जवळ येताच आपल्याकडून कार्यक्रमात व्यत्यय येतोय हे शाहरुख खानच्या लक्षात आलं. यानंतर शाहरुख खाननं आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल यांच्याशी हस्तोंदलन करत आणि मिठी मारत सॉरी म्हटलं आणि तो पुढं निघून गेला


आकाश चोप्रा काय म्हणाला?


शाहरुख खान यांच्या लक्षात आलं नाही की स्टुडिओत आलेत.मात्र, ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी सॉरी म्हटलं, असं आकाश चोप्रा म्हणाले.आपल्या शोमध्ये शाहरुख खान आल्यानं हा दिवस अविस्मरणीय असल्याचं तिघांनी म्हटलं. फॅन्सचा आजच्या मॅचमुळं पैसा वसूल झाल्याचं आकाश चोप्रा म्हणाला. केकेआरमध्ये मी खेळलोय, एकदा आठव्या आणि एकदा सहाव्या स्थानावर होतो, असं आकाश चोप्रा म्हणाला. शाहरुख खान महान आहे, आमच्याकडून त्याला प्रेम आणि आदर असं ट्विट आकाश चोप्रानं केलं.


व्हिडीओ : 






 


केकेआर तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणार ?


कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला 8 विकेटनं पराभूत केलं. केकेआरनं पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादला 160 धावांवर रोखलं. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर केकेआरनं दणदणीत विजय मिळवला. मिशेल स्टार्कच्या अफलातून बॉलिंगमुळं सनरायजर्स हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 160 धावा करता आल्या. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांची हैदराबादची आक्रमक सलामीवर जोडी क्वालिफायर-1 मॅचमध्ये चांगली कामगिरी करु शकली नाही. आता क्वालिफायर-2 मध्ये विजय मिळवून सनरायजर्स हैदराबादला अंतिम फेरीत पोहोचण्याची एक संधी आहे तर केकेआरला आयपीएलचं विजेतेपद तिसऱ्यांदा मिळवण्याची  संधी आहे.


संबंधित बातम्या :



हरभजन सिंहने हार्दिक पांड्याची केली पाठराखण, म्हणाला, त्याची काहीच चूक नाही; रोहितला धरले जबाबदार