Sanjay Dutt Left Welcome 3: ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या बहुप्रतिक्षित सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.  हा चित्रपट मल्टीस्टारर असून या सिनेमाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहतेही बरेच उत्सुक असतात. आता 'वेलकम टू द जंगल'शी संबंधित एक मोठी बातमी येत आहे. वृत्तानुसार,  संजय दत्तने (Sanjay Dutt) या चित्रपटातून माघार घेतली आहे. दरम्यान याची अनेक कारणं सध्या समोर येत आहेत. 


म्हणून सोडला सिनेमा?


अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, संजय दत्तसह अनेक स्टार्स अहमद खानच्या कॉमेडी ड्रामा 'वेलकम टू द जंगल'मध्ये काम करत आहेत. पण यातून संजय दत्तने माघार घेतली आहे.  बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, या प्रोजेक्टशी संबंधित एका एका सूत्राने संजय दत्तने चित्रपट सोडण्याचे कारण म्हणून तारखेचा मुद्दा निदर्शनास आणला आहे. . वृत्तानुसार, सूत्राने सांगितले की, "संजय दत्तला वाटले की वेलकम टू द जंगलचे शूटिंग अनियोजित पद्धतीने केले जात आहे, स्क्रिप्टमध्ये बरेच बदल केले जात आहेत, ज्यामुळे त्याच्या शूटिंगला त्रास होतोय. म्हणूनच संजय दत्तने हा सिनेमा सोडल्याचं सांगितलं आहे. पण आता कारण काहीही असो त्याने माघार घेतल्याने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. 


अक्षय कुमारची ती पोस्ट चर्चेत


डिसेंबर 2023 मध्ये अक्षय कुमारने चित्रपटात संजय दत्तसाठी एक भावनिक पोस्ट केली होती.  त्याने सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये अक्षय घोड्यावर स्वार होताना दिसत होता तर दत्त त्याच्या मागे मोटरसायकल चालवत होता. त्याने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, हा खूप सुंदर योगायोग आहे. आज वेलकमची 16 वर्ष साजरी करतोय आणि याच सिनेमाच्या तिसऱ्या भागाचे मी शुटींग करतोय. 




'वेलकम टू द जंगल' कधी प्रदर्शित होणार?


'वेलकम टू द जंगल'च्या स्टारकास्टबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात अक्षय कुमार, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, लारा दत्ता, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लीव्हर, राजपाल यांचा समावेश आहे. यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग आणि अनेक कलाकार खळबळ माजवताना दिसणार आहेत. दिग्दर्शक अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात ज्योती देशपांडे आणि फिरोज ए. नाडियाडवाला यांची निर्मिती आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Arshad Warsi Jolly LLB : पुण्यातील अपघात अन् Jolly LLBची आठवण, अर्शद वारसीचा सिनेमा आज पुन्हा चर्चेत