
Subhedar: 'सुभेदार'मधील 'मावळं जागं झालं रं' गाण्यामध्ये मिळणार आनंदाची बातमी; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट
दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार (Subhedar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

चिन्मय मांडलेकरची पोस्ट
चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'उद्या प्रदर्शित होणाऱ्या मावळं जागं झालं रं या गाण्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे, एक आनंदाची बातमी' आता मावळं जागं झालं रं या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या गाण्यामधून कोणती आनंदाची बातमी मिळेल? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.
View this post on Instagram
‘सुभेदार’ हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत.
अजय पुरकर हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकत असतात. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट यांसारख्या चित्रपटांमध्ये अजय यांनी काम केलं आहे. आता त्यांच्या ‘सुभेदार’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
