The Vaccine War First Review Out:  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) चित्रपटाचा नुकताच खास प्रीमियर झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  नुकताच सोशल मीडियावर अभिनेता आर माधवनने ( R. Madhavan)  'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War)  या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. आर. माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.


आर. माधवनची पोस्ट


आर. माधवननं द वॅक्सीन वॉर चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,'नुकताच द वॅक्सीन वॉर चित्रपट पाहिला. भारतीय वैज्ञानिक समुदायाचे बलिदान आणि कर्तृत्वा पाहून थक्क झालो. ज्यांनी भारताची पहिली लस तयार केली आणि सर्वात आव्हानात्मक काळात देशाला सुरक्षित ठेवले त्यांची कथा विवेक अग्निहोत्री यांनी सांगितली आहे. ही कथा तुम्हाला हसवेल आणि रडवेल देखील. चित्रपटामधील कलाकारांनी चांगले काम केले आहे.'  आर. माधवनच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


'चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहा आणि तुमच्या सुपरवुमनसाठी एक तिकीट नक्की खरेदी करा. जिने तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात मदत केली.' असंही आर. माधवननं पोस्टमध्ये लिहिलं.






'द वॅक्सीन वॉर' कधी होणार रिलीज?


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री  यांच्या 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), राइमा सेन, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर (Anupam Kher)  यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटात कोविड-19 महामारीच्या कठीण काळात शास्त्रज्ञांच्या केलेले कार्य दाखवण्यात येणार आहे.  'द वॅक्सीन वॉर' हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.


गेल्या वर्षी विवेक अग्निहोत्री  यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.


संबंधित बातम्या


The Vaccine War : विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'ची रिलीज डेट जाहीर! सत्य घटनेवर आधारित असणार सिनेमा