(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Allu Arjun : अल्लू अर्जुनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री? गपचूप पूर्ण केलं शाहरुखच्या 'या' सिनेमाचं शूटिंग
Jawan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Allu Arjun Completes Jawan Shoot : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने जगभरातील सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. आता त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या शाहरुख या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. किंग खानच्या या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे.
शाहरुखच्या 'जवान'मध्ये अल्लू अर्जुनची एन्ट्री!
अल्लू अर्जुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता किंग खानच्या 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमाने जगभरातील सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. त्याचा 'पुष्पा 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
'पुष्पा' या सिनेमानंतर अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. या सिनेमानंतर त्याला अनेक चांगल्या सिनेमांसाठी विचारणा होऊ लागली. दरम्यान शाहरुख खाननेदेखील आपल्या सिनेमासाठी अल्लू अर्जुनला विचारणा केली. 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनने अनेक चांगले सिनेमे नाकारले. पण किंग खानला तो नाही म्हणू शकला नाही आणि त्याने हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.
'जवान' कधी होणार रिलीज? (Jawan Release Date)
अल्लू अर्जुनने 'जवान' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. पण अद्याप निर्मात्यांनी ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवली आहे. लवकरच ते यासंदर्भात माहिती देतील. 'पठाण'नंतर शाहरुखचे चाहते 'जवान' या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 2 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
ईदच्या मुहूर्तावर अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक येणार समोर
'जवान' सिनेमात अल्लू अर्जुन किंग खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचा 'जवान' सिनेमातील फर्स्ट लूक ईदच्या मुहूर्वावर आऊट करण्यात येईल. ईदच्या मुहूर्तावर सिनेमाचा टीझर आऊट होण्यासोबत अल्लू अर्जुनची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
संबंधित बातम्या