एक्स्प्लोर

Sonu Sood Special Thali: भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव; अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट

नुकतीच सोनूनं (Sonu Sood) एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं भारतातील सर्वात मोठ्या थाळीबद्दल नेटकऱ्यांना सांगितलं. 

Sonu Sood Special Thali Pics : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो.  तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्टही शेअर करतो. नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे नाव देण्यात आलं. यावर त्यानं पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सोनूनं शेअर केली पोस्ट
सोनू सूदने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मोठी थाळी दिसत आहे. या थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. सोनूनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'भारतातील सर्वात मोठ्या थाळीला आता माझं नाव देण्यात आलं आहे. मी एक शाकाहारी माणूस आहे. तसेच माझ्यासारख्या कमी अन्न खाणाऱ्या माणसाचं नाव 20 व्यक्ती खाऊ शकतील अशा थाळीला दिले जाऊ शकते, असा मी विचार केला नव्हता.' सोनूनं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेक नेटकऱ्यांनी सोनूच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

हैदराबादमधील जिसमत जेलमंडी नावाच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या थाळीमध्ये विविध नॉनव्हेज पदार्थ आहेत. ही थाळी 20 लोक खाऊ शकतात. या थाळीचे फोटो सोनू सूदनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानंतर अनेकांनी त्याला कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद ए आजम’ या हिंदी चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. चित्रपटांबरोबरच सोनू हा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो.  जोधा अकबर, सिंह इज किंग, एक विवाह ऐसा भी,मिशन मुंबई या चित्रपटांमध्ये सोनूनं महत्वाची भूमिका साकारली. 

कोरोना काळात केली लोकांची मदत

सोनूनं करोना काळात अनेकांची मदत केली. त्यामुळे लोक त्याला रिअल लाईफ हिरो म्हणतात. सोनूनं कोरोनाकाळात केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केलं. त्यानं मुंबईत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी परत पाठवण्यास मदत केली. गरजूंच्या मदतीला सोनू नेहमी धावून जातो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sonu Sood Birthday: खिशात 5000 रूपये घेऊन आला होता मुंबईत, आज कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूदबाबत

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget