Songs of Paradise : 'सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज'चा ट्रेलर, काश्मीरच्या पहिल्या पार्श्वगायिकेचा जीवनपट उलगडणार
Songs of Paradise हा चित्रपट काश्मीरच्या पहिल्या महिला पार्श्वगायिका राज बेगम यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये सबा आझाद आणि सोनी रझदान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मुंबई : Prime Video ने आपल्या नव्या ओरिजिनल फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. साँग्ज ऑफ पॅराडाईज (Songs of Paradise) ही कहाणी स्वप्नं, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक घेऊन आली असून तिचा एक्स्लुझिव्ह प्रीमिअर (Exclusive Premiere) 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारताबरोबरच जगभरातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ ही कथा पद्मश्री पुरस्कार विजेत्या काश्मिरी गायिका राज बेगम यांच्या जीवनावर आधारित आहे. सबा आझाद (Saba Azad) आणि सोनी रझदान (Soni Razdan) यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट काश्मीरच्या पहिल्या महिला पार्श्वगायिकेला वाहिलेली आदरांजली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक दानिश रेंजू (Danish Renzu) यांनी दिग्दर्शन केले असून, निरंजन अयंगार आणि सुनयना कचरू यांनी पटकथेत योगदान दिले आहे.
View this post on Instagram
Songs of Paradise : दमदार कलाकारांचा समावेश
या चित्रपटात सबा आझाद, सोनी रझदान, झैन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारुक रैना, शिशिर शर्मा आणि लिलेट दुबे यांसारखे कलाकार झळकणार आहेत. अभय सोपोरी यांचे संगीत आणि मस्रत उन्न निसा यांचा आवाज या चित्रपटाला एक वेगळीच ओळख देतो.
नूर बेगमची कहाणी
ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना ‘नूर बेगम’ या पात्राच्या जीवनाचा प्रवास पाहायला मिळतो. सबा आझाद या नूर बेगमच्या तरुणपणाची भूमिका करत असून, सोनी रझदान या वृद्ध नूरची भूमिका साकारत आहेत. ही कथा एका तरुण काश्मिरी गायिकेची आहे जी त्या काळातील सामाजिक बंधनांना न जुमानता आपल्या संगीत साधनेसाठी लढा देते.
कलाकारांचे अनुभव
सबा आझाद म्हणते की, “राज बेगम यांच्या भूमिकेवर आधारित हा अनुभव माझ्यासाठी खास होता. त्यांच्या जीवनप्रवासातून महिलांच्या धैर्याची आणि स्वातंत्र्याची गोष्ट समोर येते.”
सोनी रझदान सांगतात की, “ही कथा माझ्या मनात लगेचच घर करून बसली. राज बेगम यांच्या असामान्य आयुष्याची ओळख करून देणं हे माझ्यासाठी सन्मानाचं होतं.”
ही बातमी वाचा:
























