Sonam Kapoor:सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई; बेबी बंप दाखवत ग्लॅमरस अंदाजात पोस्ट, आनंद अहुजाचीही कमेंट
Sonam Kapoor: आता तिच्या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि पती आनंद आहूजा यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

Sonam Kapoor: बॉलिवूडची स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने अखेर आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे. गुरुवारी सोनमने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत पहिल्यांदाच आपला बेबी बंप दाखवला आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ती हॉट-पिंक रंगाच्या आकर्षक आऊटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. फोटोसोबत तिने फक्त एकच शब्द लिहिला- “MOTHER.”
गेल्या काही महिन्यांपासून सोनमच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. ऑक्टोबरमध्ये ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.मात्र, तेव्हा कुठलीही अधिकृत माहिती समोर आली झाली नव्हती. आता तिच्या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि पती आनंद आहूजा यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
प्रेग्नन्सी अनाउन्समेंटमधील सोनमचा ग्लॅमरस अंदाज
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने हॉट-पिंक वूल सूट परिधान केला असून त्यात ओव्हरसाईझ्ड पॅडेड शोल्डर्स आणि नाजूक गोलाकार कट्स दिले होते. हा लूक पाहून अनेक फॅन्सनी तिला ‘प्रेग्नन्सीच्या काळातील प्रिन्सेस डायना व्हाइब्स’ दिल्याचं म्हटलं.
View this post on Instagram
सोनम-आनंदची प्रेमकहाणी
सोनम कपूर आणि बिझनेसमन आनंद आहूजा यांनी अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मे 2018 मध्ये विवाह केला. 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचा, वायुचा जन्म झाला. आता चार वर्षांनी त्यांच्या कुटुंबात आणखी एक सदस्य सामील होणार आहे. या आनंददायी बातमीमुळे कपूर आणि आहूजा कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. सोनम च्या पोस्ट वर आनंद अहुजाने डबल ट्रबल अशी कमेंट केलीय.

अनाउन्समेंटपूर्वीही सोनमचा अंदाज
गर्भधारणेची घोषणा करण्यापूर्वी सोनमने इंस्टाग्रामवर स्वतःचे दोन ग्लॅमरस लुक्स शेअर करत “Shaadi ready… two days and two looks I loved!” असं कॅप्शन दिलं होतं. एका फोटोमध्ये ती आनंदसोबत दिसली, तर दुसऱ्यामध्ये ती निळ्या साडीत पारंपरिक दागिन्यांसह सुंदर दिसत होती. यावरून तिचा इंडो-वेस्टर्न फॅशन मिक्स किती सहजसुंदर आहे, हे पुन्हा चाहत्यांना दिसून आलं.
View this post on Instagram
सोनम कपूरचा अभिनय प्रवास
अनिल कपूर यांची मुलगी असलेल्या सोनमने अभिनयात येण्यापूर्वी संजय लीला भन्साळींच्या ‘ब्लॅक’ (2005) चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तिची अभिनयातली सुरुवात ‘सावरिया’ (2007)पासून झाली. त्यानंतर ‘I Hate Luv Storys’, ‘रांझणा’ यांसह ‘भाग मिल्खा भाग’, ‘संजू’, ‘नीरजा’, ‘वीरे दी वेडिंग’ सारख्या अनेक चित्रपटांत तिने उल्लेखनीय भूमिका केल्या. 2023 मध्ये ती ‘ब्लाइंड’ या क्राइम थ्रिलरमध्ये दिसली होती.सोनमची दुसऱ्या बाळाच्या आगमनाची ही घोषणा केवळ तिच्या आनंदाचा क्षण नाही, तर फॅशन, मातृत्व आणि करिअर या तिन्ही क्षेत्रांत ती आजही तितक्याच आत्मविश्वासाने चमकत असल्याचा दाखलाही आहे.























