Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा विवाहसोहळा संपन्न, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केलं रजिस्टर लग्न
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नगाठ बांधली असून रजिस्टर पद्धतीने त्यांनी त्यांच्या नात्याची सुरुवात केली आहे.
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बालचा (Zaheer Iqbal) विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती. तसेच घरच्यांना देखील हे लग्न मान्य नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीरने लग्न केलं. त्यांनी रजिस्टर मॅरेज करत कोणत्या पद्धतीने लग्न करणार या चर्चांना देखील पूर्णविराम दिला.
मुंबईतील वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली. तसेच आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला अनेकांना आमंत्रित केले असून मुंबईतील दादर परिसरातील बॅस्टियन रेस्टॉरंट येथे पार पडणार आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता लग्न करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार?
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची बातमी जेव्हापासून समोर आली आहे, तेव्हापासून यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. सोनाक्षी हिंदू आहे आणि जहीर मुस्लिम आहे. या दोघांच्या वेगवेगळ्या धर्मामुळे अनेकांनी या दोघांना धारेवर धरलं. तसेच सोनाक्षी लग्नानंतर धर्म बदलणार का असाही प्रश्न अनेकांना पडला होता. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा लग्नासाठी किंवा लग्नानंतरही धर्म बदलणार नाही. मुस्लिम झहीरशी लग्न करूनही अभिनेत्री हिंदूच राहणार आहे. लग्नानंतरही ती नावही बदलणार नाही.
सोनाक्षी आणि झहीरची लव्हस्टोरी
सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.
View this post on Instagram