(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suresh Wadkar: सुरांनी प्रेक्षकांचे आयुष्य सुरेल करणाऱ्या गायक सुरेश वाडकर यांना 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान!
गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Suresh Wadkar: गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) हे आपल्या तलम आणि तरल आवाजाने गेली पाच दशकं संगीतविश्वावर आपला ठसा उमटवणारे स्वराधिश आहेत. त्यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या मुलाने गायक व्हावं अशी सुरेशजींच्या वडिलांची इच्छा. ती इच्छा सुरेशजींनी अशी पूर्ण केली की ,त्यानंतर प्रत्येक पिता आपल्या मुलानं सुरेशींसारखं गायक बनावं अशी इच्छा मनी बाळगू लागला. गुरु जियालाल वसंत यांनी केलेले संस्कार आणि गोड आवाजाचं वरदान मिळालेल्या सुरेशजींच्या गाण्यांनी इतिहास रचला नसता तरच नवल.
दिवसाची सुरुवात ज्या सुरांनी व्हावी ते ओमकार स्वरुपा असो किंवा मग मेरी किस्मत मे तू नही शायद ही प्रियकराची आर्त वेदना, सुरेशजींच्या गाण्यांनी प्रत्येक क्षणाची सोबत केली. सुरांनी आपल्या साऱ्यांचं आयुष्य सुरेल करणाऱ्या, आपल्या गाण्यानं साऱ्यांनाच तृप्त तृप्त करणाऱ्या स्वराधिशाला, आपल्या लाडक्या सुरेश वाडकर यांना एबीपी माझा कृतज्ञतापूर्वक माझा सन्मान पुरस्कार प्रदान करत आहे.
सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांनी त्यांचे गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचे औपचारिक धडे घ्यायला सुरुवात केली.
सुरेश वाडकर यांच्यासोबतच केदार शिंदे, अभिनेत्री श्रद्धा कपूर,संगीतकार अशोक पत्की यांना देखील एबीबी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सुरेश वाडकर यांची गाणी
'छोड़ आए हम' 'चप्पा चप्पा चरखा चले', 'ऐ जिंदगी गले लगा ले', 'लगी आज सावन की' या सुरेश वाडकर यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांनी अनेत भावगीते, भक्ती गीते देखील गायली. मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांची गाणी लोक आवडीनं ऐकतात. तसेच सुरेश वाडकर हे गाण्यांचे कार्यक्रमांचे परीक्षण देखील करतात. त्यांनी 'मेरी किस्मत में तू नहीं साहेब', 'मैं हूं प्रेम रोगी' यांसारखी मधुर गाणी मनोरंजन विश्वाला दिली.
‘सूर आनंदघन’, ‘ओमकार स्वरूपा’, ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’, ‘देवाचिये द्वारी’ अशी भक्तीगीते ऐकून श्रोते देवाच्या चरणी लीन झाले. ‘प्रेमरोग’, ‘सदमा’ अशा चित्रपटातील त्यांची गाणी खूप गाजली. संगीतविश्वातील अमुल्य योगदानासाठी सुरेश वाडकर यांना 2020मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारही देण्यात आला.
संबंधित बातम्या