एक्स्प्लोर

Laal Singh Chaddha: ‘लाल सिंह चड्ढा’चं सोशल मीडियावर कौतुक, टीकेची झोड उठल्यावर गायक राहुल देशपांडेंनी दिले स्पष्टीकरण!

Laal Singh Chaddha: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

Laal Singh Chaddha: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि या चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली म्हणून गायक राहुल देशपांडेही (Rahul Deshpande) टीकेचे धनी झाले आहेत. आमिर खानने देशातल्या असंहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून देश सोडण्याबाबतचे वक्तव्य काही वर्षांपूर्वी केले होते. त्यावरून वादही झाला होता. या वादानंतर प्रथमच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा काही संघटनांनी केली होती. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाला काही संघटनांकडून विरोध होतोय.

‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोला गायक राहुल देशपांडे यांचे नाव विशेष निमंत्रितांमध्ये सामील होते. त्यानंतर चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट राहुल देशपांडे यांनी लिहिली. त्यावरून टीकेचं लक्ष्य झाल्यानंतर राहुल देशपांडेंनी स्पष्टीकरण दिलंय.

काय म्हणाले राहुल देशपांडे?

नुकताच आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीजच्या आधी या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. या खास शोसाठी गायक राहुल देशपांडे देखील उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमिर खानसोबत एक फोटो शेअर करत या चित्रपटाचे कौतुक केले. मात्र, त्यानंतर राहुल देशपांडे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होऊ लागली. यावर आता राहुल देशपांडे यांनी पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिले आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘नमस्कार रसिक मित्रहो!! लालसिंग चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमीयरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही. आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती! लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा!!’

आमिर खानचं कमबॅक

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित अन् बहु प्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बिग बजेट चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ या नवीन चित्रपटातून पुनरागमन करत आहे. मात्र, या दरम्यान त्याच्या या चित्रपटावर जोरदार टीका देखील होत आहे. असे, असूनही आमिर खानच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

वाचा इतर बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Embed widget