एक्स्प्लोर

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवच्या 'लग्न कल्लोळ'चा धमाकेदार ट्रेलर आऊट; नेटकरी म्हणाले,"आपल्या सिद्धूचा स्वॅगच भारी"

Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधवचा आगामी 'लग्न कल्लोळ' (Lagnakallol) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आता आऊट झाला आहे.

Siddharth Jadhav : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आपल्या सिद्धूच्या आगामी 'लग्न कल्लोळ' (Lagnakallol) या सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर पाहून चाहते आपल्या सिद्धूचा स्वॅगच भारी, असं म्हणू लागले आहेत. 

कल्लोळ घालायला येतोय ‘लग्न कल्लोळ’

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने.

तगडी स्टारकास्ट असलेला 'लग्न कल्लोळ' (Lagnakallol Release Date) 

‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख,  भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

'लग्नकल्लोळ' कधी रिलीज होणार? 

लग्न म्हटलं की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 1 मार्चला मिळणार आहे. हा एक रॅामकॅाम चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. 

'लग्न कल्लोळ' सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात,"कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी, हे आधीपासूनच मनात होते. त्यातूनच ‘लग्नकल्लोळ’ची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली. कलाकार, दिग्दर्शक, लेखक, संगीत, तांत्रिक बाबी या सगळ्यासाठी माझ्यासोबत इंडस्ट्रीतील नामंवत मंडळी जोडली गेली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा रॅामकॅाम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल. सोबतच यात भावनाही आहेत".

संबंधित बातम्या

Lagnakallol : सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार टीझर आऊट! मयुरी देशमुख कोणासोबत अडकणार लग्नबंधनात?

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget