Siddharth Jadhav : लाईट्स...कॅमेरा... अॅक्शन; सिद्धार्थ जाधवने केली नव्या सिनेमाची घोषणा
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवचा 'थ्री चिअर्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Siddharth Jadhav On Three Cheers : अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'सर्कस' (Circus) सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आपल्या सिद्धू'ने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
'सर्कस' सिनेमानंतर सिद्धार्थ आता 'थ्री चिअर्स' (Three Cheers) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने "थ्री चिअर्स'...नवा दिवस, नवी भूमिका, नवा सिनेमा", असं म्हणत नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
सिद्धार्थने नव्या सिनेमाची घोषणा केल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थच्या पोस्टवर अभिनंदन भावा, भावड्या तुझा विषय हार्ड आहे, 'थ्री चिअर्स' सुपरहिट होणार, नव्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
सिद्धार्थच्या आगामी 'थ्री चिअर्स' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पारितोष पेंटर (Paritosh Painter) सांभाळणार आहेत. तसेच या सिनेमात विजय पाटकर (Vijay Patkar), जॉनी लिव्हर (Johnny Lever), श्वेता गुलाटी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सिद्धार्थची नेमकी भूमिका काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सिद्धार्थचा मोठा चाहतावर्ग असून त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सिद्धार्थ नुकताच 'सर्कस' या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत झळकला होता. तसेच 'बालभारती' हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या तो 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता त्याच्या चाहत्यांना 'थ्री चिअर्स' या सिनेमाची उत्सुकता आहे.
सिद्धार्थने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमासह त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. रंगभूमीदेखील त्याने गाजवली आहे. अनेक सुपरहिट सिनेमांत सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
संबंधित बातम्या