(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Siddharth: 'त्यांनी माझ्या वृद्ध पालकांना... '; विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्यांवर अभिनेता सिद्धार्थनं केला आरोप
नुकताच सिद्धार्थनं (Siddharth) विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन सिद्धार्थनं सुरक्षा कर्मचार्यांवर त्याच्या पालकांना त्रास दिल्याचा आरोप केला.
Siddharth: 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील त्याची मत मांडतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थनं विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन सिद्धार्थनं सुरक्षा कर्मचार्यांवर त्याच्या पालकांना त्रास दिल्याचा आरोप केला.
सिद्धार्थची पोस्ट
मदुराई विमानतळावरील फोटो शेअर करुन सिद्धार्थनं पोस्टमध्ये लिहिलं, 'सीआरपीएफनं मदुराई विमानतळावर आम्हाला 20 मिनिटे त्रास दिला. त्यांनी माझ्या वृद्ध पालकांना त्यांच्या बॅगमधून नाणी काढायला लावली. आम्ही त्यांना वारंवार इंग्रजीत बोलायला सांगितलं तरी देखील ते आमच्यासोबत हिंदीत बोलले. आम्ही त्यांचा निषेध केला. त्यानंतर ते म्हणाले, "भारतात हे असेच आहे.' सिद्धार्थच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
बॉलिवूड बरोबरच सिद्धार्थने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. महा समुद्रम, चश्मे बद्दूर, स्ट्रायकर,बॉम्मारिल्लु, ओय!, बॉइज या चित्रपटांमध्ये सिद्धार्थने काम केले आहे. तसेच 'एस्केप लाइव' या सीरिजमध्ये देखील सिद्धार्थनं काम केलं. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
सिद्धार्थचा आगामी चित्रपट
सिद्धार्थ हा दिग्दर्शक शंकर यांच्या 'इंडियन 2' या आगामी चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट कमल हसन यांच्या 1996 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'इंडियन 2' मध्ये सिद्धार्थसोबतच अभिनेत्री काजल अग्रवाल देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: