Shubhangi Tambale: मराठमोळी अभिनेत्री शुभांगी तांबळेचा पार पडला साखरपुडा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
अभिनेत्री शुभांगी तांबाळेनं (Shubhangi Tambale) नुकतेच तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shubhangi Tambale: अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतात. नुकतीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एक खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री शुभांगी तांबाळेनं (Shubhangi Tambale) नुकतेच तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभांगीला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभांगीनं तिच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. शुभांगी आणि करण मेहता यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शुभांगी हिरवा लेहंगा, स्टोनची ज्वेलरी आणि हतात हिरव्या बांगड्या अशा लूकमध्ये दिसत आहे. शुभांगीनं या फोटोंना "माझ्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट' असं कॅप्शन दिलं आहे. अनेकांनी फोटोला कमेंट करुन शुभांगीच्या लूकचं कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
शुभांगीनं शेअर केलेल्या या फोटोंना अभिनेत्री भाग्यश्री मोटे, अभिनेता सुयश टिळक यांनी आणि शुभांगीच्या चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
मालिका आणि चित्रपटांमध्ये शुभांगीनं केलं काम
शुभांगीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ससुराल सिमर का-2 या मालिकेमध्ये शुभांगीनं काम केलं. एका तेलगू चित्रपटामध्ये देखील तिनं काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या बॉइज-2 या चित्रपटांमध्ये शुभांगीनं महत्त्वाची भूमिका साकारली. शुभांगी ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
