एक्स्प्लोर

Shivali Parab : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा बोल्ड अंदाज; ‘काय उमगेना’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Shivali Parab : ‘प्रेमप्रथा धुमशान’ या चित्रपटात अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.

Shivali Parab : सिंधुदुर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा मांडणाऱ्या ‘प्रेम प्रथा धुमशान’ (Prem Pratha Dhumshaan) या चित्रपटात अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटातलं ‘काय उमगेना’ हे नवं गाणं लाँच करण्यात आलं असून, 4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. या गाण्यात शिवालीनं लीपलॉकिंग सीन्समधून आपला बोल्डनेस दाखवला आहे.

ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेमप्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे.

पाहा गाणे :

प्रेमप्रथा धूमशान चित्रपटातलं ‘धुमशान घाला रे’ हे मालवणी गाणं आधीच सगळीकडे वाजत आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, थरारक प्रेमकथा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गावपळण या गूढ प्रथेची पार्श्वभूमी असा मसाला असलेला ‘प्रेमप्रथा धुमशान’ हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवणार हे नक्की!

गावपळणीची अनोखी प्रथा अन् प्रेमकथा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावांमध्ये गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठराविक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वंदता आहेत. मात्र, आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट तयार झाला आहे. मात्र, या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा असं सारं काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. गावपळण या प्रथेविषयीच सगळ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ (Prem Pratha Dhumshaan) या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

हेही वाचा :

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब झळकणार 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमात; टीझर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget