एक्स्प्लोर
Advertisement
'ग्रेट ग्रँड मस्ती'च्या निर्मात्यांना शायनी अहुजाची नोटीस
मुंबई : प्रदर्शनापूर्वीच लिक झाल्यामुळे गोत्यात आलेला अॅडल्ट कॉमेडी चित्रपट ग्रेट ग्रँड मस्तीला आणखी एक झटका बसला आहे. अभिनेता शायनी अहुजाने चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
बालाजी मोशन पिक्चर्स आणि मारुती इंटरनॅशनल यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात कामवाल्या बाईचं नाव 'शायनी' ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शायनी अहुजाने निर्माते एकता कपूर, जितेंद्र आणि इंदर कुमार यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
शायनी अहुजाला मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून शिक्षा झाली होती. याच प्रकरणाशी संबंध जोडत चित्रपटातील मोलकरणीचं नाव शायनी ठेवल्याचा दावा अहुजाने केलाय, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
2009 मध्ये शायनीच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मार्च 2011 मध्ये त्याला सात वर्षांची कैद सुनावण्यात आली होती. शायनीने या निर्णयाला आवाहन दिलं असून मुंबई हायकोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे.
ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच ऑनलाईन लीक झाला होता. त्यामुळे नियोजित तारखेच्या (22 जुलै) आठवडाभर आधीच तो रिलीज करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement