Shilpa Shetty: स्वातंत्र्य दिनाला शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी शिल्पाला केलं ट्रोल; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली, 'मी सहसा दुर्लक्ष करते...'
शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

Shilpa Shetty: अनेक बॉलिवूड कलाकारांनी स्वातंत्र्य दिन खास पद्धतीने साजरा केला. या दिवशी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने (Shilpa Shetty) आपल्या कुटुंबियांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
शिल्पानं ध्वजारोहण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान, ध्वजारोहण करताना चप्पल घातल्यामुळे नेटकऱ्यांनी शिल्पाला ट्रोल केले. आता शिल्पाने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
शिल्पानं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,'ध्वजारोहण करण्यापूर्वी चप्पल काढायची असते. एवढं तरी तुला माहित असायला हवं' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मॅडम आधी चप्पल काढा'
View this post on Instagram
शिल्पानं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
शिल्पानं (Shilpa Shetty) या व्हिडीओला कमेंट करुन ट्रोल करण्याऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं, व्हिडीओला कमेंट करुन ती म्हणाली, 'ध्वज फडकवताना जे नियम पाळायचे असतात ते मला माहीत आहेत. ध्वज फडकवताना माझ्या मनात देशासाठी आदराची भावना आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. मनात चांगल्या भावना ठेवून आजची पोस्ट शेअर केली. सर्व ट्रोलर्सकडे मी सहसा दुर्लक्ष करते. तुम्ही या दिवशी नकारात्मकता पसरवत आहात. कृपया योग्य माहिती मिळवा.' शिल्पानं दिलेल्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

शिल्पाचे चित्रपट
बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच तिनं ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण देखील केलं. शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते शिल्पाच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.शिल्पाचा काही महिन्यांपूर्वी निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये शिल्पासोबतच अभिमन्यु दसानी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. शिल्पाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Shilpa Shetty : सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर भडकली शिल्पा; म्हणाली, 'भावा...'






















