(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sherlyn Chopra Shocking Confession : होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
Sherlyn Chopra Shocking Confession : एका अभिनेत्रीने पैसे मिळवण्यासाठी देह विक्रीचा व्यवसाय केला होता. या अभिनेत्रीने याची कबुली दिली होती.
Sherlyn Chopra Shocking Confession : सिनेसृष्टीतील ग्लॅमरस जगतामध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. याच सिनेइंडस्ट्रीत अनेकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण असतो. याच दरम्यान काहीजण चुकीचा मार्ग निवडतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, या कलाकारांचा भूतकाळ पाठलाग करत असतो. एका अभिनेत्रीने पैसे मिळवण्यासाठी देह विक्रीचा व्यवसाय केला होता. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर याची कबुली दिली होती.
सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊच, लैंगिक शोषणाबाबतच्या अनेक चर्चा होत असतात. अशाच एका अभिनेत्रीने आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी शरीरविक्री केली. बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीने आपली छाप सोडली. ही अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा.
कशी समोर आली ही बाब...
खुद्द शर्लिन चोप्राने काही काळापूर्वी सोशल मीडियावर याची कबुली दिली होती. कधी काळी तिने पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या शरीराची विक्री केली होती.
View this post on Instagram
एकदा शर्लिन चोप्राने ट्विट केले होते की, अनेकवेळा माझ्याशी पैसे घेऊन सेक्ससाठी संपर्क साधला गेला होता आणि मी ते पैशासाठीही काम केले. मी गरीब किंवा वाईट किंवा चांगली मुलगी असल्याच्या नावाखाली हे विधान करत नाहीये, हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे लोक अजूनही मला मेसेज करतात आणि माझ्याशी संबंध ठेवू इच्छितात त्यांनी हे समजून घ्यावे की आता मी तशी नाही आणि हे काम आता करत नाही. मी ज्यांशी यापूर्वी संबंध ठेवले होते, ते आठवतही नसल्याचे तिने म्हटले.
काही लोकांनी सोशल मीडियावर शर्लिन चोप्राला मेसेज केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने सार्वजनिकरित्या हे वक्तव्य केले असल्याची चर्चा होती. आपली भूमिका स्पष्ट करताना शर्लिनने आपल्या कामाचा बचाव केला होता आणि आता आपण हे काम सोडून दिले असल्याचे सांगितले.
शर्लिन चोप्रा मागील बऱ्याच काळापासून कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग नाही. पण ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. पापाराझीसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होतात. नुकतेच त्याने एक फोटोशूटही केले आहे.