एक्स्प्लोर

कंगना माझ्या मुलाला मारहाण करायची, शेखर सुमन यांचा आरोप

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वादाने टोक गाठलं असताना अभिनेते शेखर सुमन यांनी यात उडी घेतली आहे. कंगनाचा एक्स बॉयफ्रेण्ड अध्ययन सुमन याच्या दाव्यांना पाठबळ देत शेखर सुमन यांनी कंगनावर काळी जादू केल्याचा आरोप केला आहे. शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन आणि कंगना सात वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांच्यात अचानक आलेल्या दुराव्याचं कारण कोणालाच समजत नव्हतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं अचानक एकमेकांपासून दूर झालं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.     कंगनाने करणी केली : ब्रेकअपच्या सात वर्षांनी अध्ययनने 'डीएनए' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगना आपल्याला मारहाण करायची, असा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नाही, तर आपल्यावर काळी जादू म्हणजे ब्लॅक मॅजिकसारख्या अघोरी प्रकारांचा अवलंब केल्याचा दावाही अध्ययन सुमनने केला आहे. विशेष म्हणजे त्याची आई अलका आणि वडील शेखर सुमन यांनी 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत अध्ययनच्या दाव्यांना पाठबळ दिलं आहे. 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत अध्ययनने कंगनावरील आरोपांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. 'मी माझ्या आईला कंगनाचे प्रताप सांगितले. तिने आमच्या कौटुंबिक ज्योतिषींना बोलावलं. त्यांनी मला विचारलं की कंगना तुझ्यासाठी जेवण बनवते का, मी हो सांगताच त्यांनी कंगना माझ्या जेवणात अशुद्ध रक्त मिसळत असल्याचा दावा केला.' असं अध्ययनने म्हटलं आहे. 'मी ज्योतिषाचं म्हणणं ऐकलं नाही. त्याच दरम्यान माझं कंगनाशी मोठं भांडण झालं. मी रोज रात्री माझ्या पीआरला फोन करुन रडायचो. स्कॉचची बाटली घेऊन मी मरिन ड्राईव्हला जाऊन बसायचो. मी दारु पिऊन मेलोही असतो. आई माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची. आमचे कौटुंबिक ज्योतिषी सलमानच्या 'दस का दम' शो मध्ये गेले होते. तिथे कंगना असताना तू पिशाच्च आहेस, असा टोला त्यांनी तिला हाणला, मात्र तिने हा प्रकार हसण्यावारी नेला.' असं अध्ययनने मुलाखतीत सांगितलं.     कंगनाची अध्ययनला मारहाण : कंगनाने अध्ययनला अपमानित करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला की आमचं काहीही ऐकेना. तो कंगनावर जिवापाड प्रेम करायचा, तिच्या सर्वाधिक विश्वास ठेवायचा, मात्र ती त्याला धोका देत होती. कंगना अध्ययनशी भांडायची, मारहाण करायची. सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर अध्ययनला जेव्हा तिचं खरं रुप समजलं, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला.   ड्रायव्हरला मारहाण : 2008 मध्ये कंगनाने आपल्या ड्रायव्हरला मारहाण केल्याचा दावाही शेखर सुमनने केला आहे. राज 2 च्या सेटवर दोघांची भेट झाली होती मात्र या भेटीचं मैत्री आणि प्रेमात झालेलं रुपांतर या टप्प्यावर पोहचेल, असं स्वप्नातही वाटलं नसल्याचं शेखर सुमन सांगतात. अध्ययन आता सात वर्षांनी या प्रकारातून बाहेर आला आहे. लोकांना त्याचं दुःख समजावं, म्हणून त्याने ही गोष्ट सर्वांना सांगितली, असं शेखर म्हणतात.     कंगनाचं मौन :   कंगनाशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता, अध्ययन सुमनचे आरोप हास्यास्पद आहेत, त्यावर कंगनाला काहीही उत्तर द्यायचं नाही, असं तिच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget