एक्स्प्लोर

Gulmohar : 'गुलमोहर'मध्ये शर्मिला टागोरच्या पतीची भूमिका कोणी साकारलीय? जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Gulmohar : शर्मिला टागोर, मनोज वायपेयी, अमोल पालेकर यांचा 'गुलमोहर' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Gulmohar Movie : राहुल चित्तेला (Rahul Chittella) दिग्दर्शित 'गुलमोहर' (Gulmohar) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राहुल चित्तेलाने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee), शर्मिला टागोर (Sharmila Tagore), सूरज शर्मा (Suraj Sharma) आणि अमोल पालेकर (Amol Palekar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात शर्मिलाने कुसुम बत्राचे पात्र साकारले आहे. सिनेमात शर्मिलाच्या पतीचे निधन झाले असून एका फ्रेममध्ये तिच्या पतीची झलक पाहायला मिळाली आहे. सिनेमातील शर्मिलाच्या पतीने प्रेक्षकांना मात्र आश्चर्यचकित केलं आहे. 

'गुलमोहर' सिनेमाच्या एका फ्रेममध्ये कुसुम बत्राच्या पतीचा फोटो पाहायला मिळत आहे. फोटोत दाखवण्यात आलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय भारतीय सिने-निर्माते रमेश शर्मा (Ramesh Sharma) आहेत. रमेश शर्मा यांनी 'न्यू दिल्ली टाइम्स' (1986) (New Delhi Times) हे नाटक आणि 'अहिंसा गांधी : द पॉवर ऑ द पॉवरलेस' (Ahimsa Gandhi : The Power Of Powerless) सारख्या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या कलाकृतींमधील कथांनी प्रेरित होऊन निर्मात्यांनी बत्रा कुटुंबाचा सर्वेसर्वा म्हणून रमेश शर्मा यांची निवड केली आहे. 

'गुलमोहर' (Gulmohar Movie) या सिनेमाचा दिग्दर्शक राहुल चित्तेला रमेश शर्माच्या (Ramesh Sharma) 'न्यू दिल्ली टाइम्स'चा (New Delhi Times) मोठा चाहता आहे. या नाटकात शशी कपूर (Shashi Kapoor), ओम पुरी (Om Puri) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) मुख्य भूमिकेत होते. राहुल हा रमेश यांचा आणि त्यांच्या सिनेमांचा मोठा चाहता आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमात रमेश शर्मा असावेत अशी राहुलची इच्छा होती. 

राहुलने आपल्या पहिल्या सिनेमासाठी रमेश शर्मा यांना विचारणा केली होती. पण इतर कामात व्यस्त असल्यामुळे रमेश यांना राहुलची ऑफर स्वीकारता आली नाही. पण तरीदेखील रमेश शर्मा राहुलच्या 'गुलमोहर'चा भाग होऊ शकले. पतीच्या निधनामुळे शर्मिलाच्या आयुष्यात एक ट्विस्ट आला आहे हे जेव्हा सिनेमात दाखवण्यात येते तेव्हा रमेश शर्मा यांची झलक पाहायला मिळते. रमेश शर्मा यांनी 2006 मध्ये 'द जर्नलिस्ट' (The Journalist) आणि 'द जिहादी : द मर्डर ऑफ डॅनियल पर्ल'सारखे (The Jihadi : The Murder Of Daniel Pearl) माहितीपट बनवले आहेत. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 04 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
Bollywood Actor : धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 May 2024: ABP MajhaSangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप
Bollywood Actor : धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
धाब्यावर काम केलं, शाहरुखसोबत डेब्यू केला अन् अभिनयाने वेडं लावलं! ओळखलंत का?
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Embed widget