Mukesh Khanna: 'मी 160 वर्षांचा..' वयावरून ट्रोल करणाऱ्यांना 'शक्तिमान' फेम मुकेश खन्नांचं खरपूस उत्तर, म्हणाले..
लोक माझं वय मोजत आहेत. मला म्हातारा झालो आहे असं म्हणतात. म्हाताऱ्या वयात याला ताकदवान बनायचं आहे असं म्हणत ट्रोल केलं जातंय. त्यांना मी एवढंच सांगतो...
Mukesh Khanna:'शक्तिमान'फेम अभिनेते मुकेश खन्ना हे सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असल्याने चर्चेत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेता रणवीर सिंगला शक्तिमानच्या भूमिकेसाठी नकार दिल्याच्या वक्तव्याची चर्चा होती. वयावरून सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी माझं वय 160 वर्ष आहे असं म्हणत ट्रोलर्सला खरपूस उत्तर दिलं आहे. त्यांची ही सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या youtube चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांना वयावरून ट्रोल करणाऱ्या ट्रॉलर्सची त्यांनी चांगलीच हजेरी घेतल्याचं दिसतय. मुकेश खन्ना हे शक्तिमान चा भूमिकेत परत येणार असल्याचं कळल्यानंतर अनेकांना सुखद धक्का बसला तर काहींनी या अभिनेत्याला त्याच्या वयावरून ट्रोल केल्याचेही दिसून आलं. ट्रॉलर्स वरती मुकेश खन्ना चांगलेच भडकल्याचं दिसतंय. त्यांनी एक स्वतंत्र व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे.
मी तर आहेच शक्तिमान...
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं, आज-काल नकारात्मकता जास्त वाढते आणि पॉझिटिव्हिटी कमी विकली जाते. मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. जात मी देशभक्तीपर गीतातून मुलांसमोर येतो. त्यात मी कुठेही मी शक्तिमान बनत वापस येतोय असं म्हटलं नव्हतं. परंतु मी तर शक्तिमान आहे. नामी गुटखा विकायला आलोय ना कुठल्या गोष्टीला प्रमोट करण्यासाठी आलोय. या गाण्यावर स्तुती करण्याऐवजी मला ट्रोल केलं जात आहे. मी ट्रॉलिंगला घाबरत नाही.
View this post on Instagram
माझं वय 160 वर्ष आहे...
लोक माझं वय मोजत आहेत. मला म्हातारा झालो आहे असं म्हणतात. म्हाताऱ्या वयात याला ताकदवान बनायचं आहे असं म्हणत ट्रोल केलं जातंय. ट्रोल करणाऱ्या लोकांना मी एवढंच सांगतो की माझं वय 160 आहे. मी लहान असताना भीष्म पितामहाची भूमिका केली होती. दहा वर्षांनी मी मोठा झाल्यावर शक्तिमानची भूमिका केली. त्यामुळे मी सर्वांपेक्षा लहान आहे. मी 160 वर्षांचा असलो तरी वयाला काही अर्थ नाही ती फक्त संख्या आहे. वय हे कामाने बनलेले असते. विचारांनी बनलेले असते. माझे विचार तुमच्यापेक्षा शुद्ध आहेत.