Shaitaan Box Office Collection Day 1 : अजय देवगण अन् आर. माधवनच्या 'शैतान'चा जलवा! रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस
Ajay Devgn Movie Box Office Collection : अजय देवगणचा बहुचर्चित 'शैतान' (Shaitaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीच या सिनेमाने बंपर कमाई केली आहे.
Shaitaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), आर. माधवन (R. Madhavan) आणि ज्योतिका (Jyothika) यांचा 'शैतान' (Shaitaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने बंपर कमाई केली आहे.
'शैतान'ने पहिल्या दिवशी किती कमावले? (Shaitaan Box Office Collection Day 1)
'शैतान' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. 8 मार्च 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आता रिलीजच्या पहिल्या दिवसाचं या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने 14.50 कोटींची कमाई केली आहे.
महिला दिन आणि महाशिवरात्रीचा 'शैतान' सिनेमाला फायदा झाला आहे. आता वीकेंडचादेखील परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून येईल. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होणार आहे.
आर. माधवन अन् जानकीच्या अभिनयाने जिंकली मने
'शैतान' या सिनेमातील अजय देवगनच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. दुसरीकडे आर. माधवन आणि जानकी बोडीवालाने आपल्या दर्जेदार अभिनयाने सर्वांना थक्क केलं आहे. 'शैतान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विकास बहल यांनी सांभाळली आहे. 'शैतान' हा गुजराती सिनेमा वशचा हिंदी रिमेक आहे.
'या' सिनेमांनी 2024 मध्ये केली सर्वाधिक कमाई
बॉलिवूडसाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. हृतिक रोशनच्या (Hithik Roshan) 'फायटर' (Fighter) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 24 कोटींची कमाई केली. शाहिद कपूरच्या 'तेरी बातों'में या सिनेमाने 7 कोटी आणि यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'ने सहा कोटींची कमाई केली आहे. आता अजयचा 'शैतान' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'शैतान' ठरणार 2024 चा ब्लॉकबस्टर सिनेमा?
'शैतान'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी धमाकेदार ओपनिंग केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 60 ते 65 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीच या सिनेमाने 10 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा 2024 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या