एक्स्प्लोर

...म्हणून शाहरुख ममता बॅनर्जींच्या पाया पडला!

शाहरुख खानने ममतांच्या पाया पडून त्यांना वंदन केलं.

कोलकाता: अभिनेता शाहरुख खानने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला आपल्या सॅन्ट्रो कारने एयरपोर्टपर्यंत सोडलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ गाजतो आहे. ममता बॅनर्जी यांनी एयरपोर्टला गाडी आल्यानंतर गाडीमधून उतरून शाहरुखसाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला, तर शाहरूखनेही गाडीतून उतरून ममता यांचे आशीर्वाद घेतले. शाहरुख खानने ममतांच्या पाया पडून त्यांना वंदन केलं. कोलकात्यात शुक्रवारी ममता बॅनर्जींसह बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, महेश भट्ट, कमल हसन आणि काजोल यांच्या उपस्थितीत, 23 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर शाहरुख खान मुंबईकडे येण्यासाठी कोलकात्यातील एअरपोर्टकडे निघाला. त्यावेळी स्वत: ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला स्वत:च्या गाडीतून विमानतळापर्यंत सोडलं. ममतांच्या सँट्रो कारमध्ये शाहरुख मागील सीटवर बसला होता. विमानतळावर उतरल्यानंतर शाहरुख ममतांच्या पाया पडला. शाहरुख आणि ममतांचे चांगले संबंध आहेत. ममतांनी शाहरुखला पश्चिम बंगालचा ब्रँड अम्बेसेडरही बनवलं आहे. शाहरुखही ममतांना बहिण मानतो. त्याच प्रेमातून महागड्या गाड्यातून फिरणारा शाहरुख सँट्रो कारमध्ये बसायला कतरला नाही. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
Welcome to the Jungle: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?
The India Story Teaser: कलिंगडात विष, भेसळयुक्त दूध आणि वेदनेनं विव्हळणारी मुलं; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालच्या सिनेमामुळे खळबळ, Teaser
कलिंगडात विष, भेसळयुक्त दूध आणि वेदनेनं विव्हळणारी मुलं; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालच्या सिनेमामुळे खळबळ, Teaser
'ठायी ठायी स्वामींचा गजर'; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2'नं मार्केट गाजवलं; 36 व्या दिवशीही सिनेमागृहात प्रेक्षकांची हजेरी
'ठायी ठायी स्वामींचा गजर'; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2'नं मार्केट गाजवलं; 36 व्या दिवशीही सिनेमागृहात प्रेक्षकांची हजेरी

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर 4 ड्रोनद्वारे हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
Uddhav Thackeray : दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही : उद्धव ठाकरे
कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
Embed widget