Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मुंबईतील मालाड इथल्या चाळीवर काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लोकांची घरं जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता अभिजीत केळकर (Marathi Actor Abhijit Kelkar) म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. या ना त्या कारणानं अभिजीत केळकर (Abhijit Kelkar) चर्चेत असतोच. पण, सध्या तो चर्चेत आला आहे, त्याच्या फेसबुक पोस्टमुळे (Abhijit Kelkar Facebook Post). अभिजीत केळकरनं फेसबुक पोस्टमध्ये त्याच्या जीवाला धोका असल्याचं नमूद केलंय. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्याकडे मदतीसाठी विनंतीही केलीय. त्याच्या मुंबईतील (Mumbai News) मालाड इथल्या चाळीवर काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लोकांची घरं जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आमच्या आई-वडिलांनी इथं रक्ताचं पाणी केलं. आम्हाला वाढवलं. काडी-काडी जमवून संसार केला. तुम्ही हवं तर याला झोपडपट्टी म्हणा. पण गरिबांचं छप्पर हिरावून त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे, असं अभिजीत केळकरनं पोस्टमध्ये म्हटलंय.
मराठी अभिनेता अभिजीत केळकरनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? (Abhijit Kelkar Facebook Post)
मराठी अभिनेता अभिजीत केळकर यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझ्या मनात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रेम, आदर आहे. पण, दिव्याखाली अंधार आहे. कारण आमच्या मालाड पूर्व, पुष्पापार्क, बाणडोंगरी या भागात असलेली आमची घरं वडलोपार्जित आहे. आमच्या आई-वडिलांनी इथं रक्ताचं पाणी केलं. आम्हाला वाढवलं. काडी-काडी जमवून संसार केला. तुम्ही हवं तर याला झोपडपट्टी म्हणा. पण गरिबांचं छप्पर हिरावून त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे..."
"बिल्डरच्या पैशावरून हे लोकप्रतिनिधी सगळं हातळत आहेत. यांच्या पैशाच्या जोरावर सिस्टिमला हातावर खेळवलं जातय. गुंड पाठवून लोकांना धमक्या दिल्या जाताय. तसंच, कोणतही अॅग्रीमेंट न करता, कागदपत्र न दाखवता लोकांची घर जमीन दोस्त केली जात आहे. मी हे सहा महिन्यांपासून बघतोय. मी कोणाचं नाव घेणार नाही. मला कोणाला बदनाम करायचं नाही. पण पुढे जाऊन नावं घ्यावी लागतीय. कारण मी कोणाला घाबरत नाही. माझ्या जीवाला धोका आहे. घरी आई, बायको, मुलांना सांगून निघालोय. आम्हाला न्याय हवा आहे. आम्हाला हक्काची घरं हवी आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे...", असं अभिजीत केळकरनं पोस्टमध्ये म्हटलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















