Shahrukh Khan: 'लग्न ठरलंय, काय करु?', 'तुझा व्हॉट्सअॅप नंबर देतो का?' चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांना शाहरुखनं दिली भन्नाट उत्तरं
आता शाहरुखनं (Shahrukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपट रिलीज होण्याआधी ट्विटरवरील काही युझर्सच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत.
![Shahrukh Khan: 'लग्न ठरलंय, काय करु?', 'तुझा व्हॉट्सअॅप नंबर देतो का?' चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांना शाहरुखनं दिली भन्नाट उत्तरं Shahrukh Khan hosted an ask me anything session on twitter he answers fans questions Shahrukh Khan: 'लग्न ठरलंय, काय करु?', 'तुझा व्हॉट्सअॅप नंबर देतो का?' चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांना शाहरुखनं दिली भन्नाट उत्तरं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/18/c2bb51db68edd720a92acad42ebc1ff31671339795997259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. सोशल मीडियावर काही नेटकरी या चित्रपटावर टीका करत आहेत. आता शाहरुखनं पठाण चित्रपट रिलीज होण्याआधी ट्विटरवरील काही युझर्सच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रश्नाला शाहरुखनं दिलं हटके उत्तर
एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'माझं लग्न 26 जानेवारीला ठारलं आहे, काय करु?' यावर शाहरुखनं उत्तर दिलं, 'लग्न कर, हनिमुनच्या हॉलिडेमध्ये चित्रपट बघ'
Shaadi kar le…honeymoon ki holidays mein film dekh lena https://t.co/IWsW5NgCWC
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
'हॅलो शाहरुख सर, तुम्ही प्लिज तुमचा व्हॉट्सअॅप नंबर शेअर करता का? तुमच्यासोबत बोलून नंतर नंबर डिलीट करतो.' चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'मी मेसेज आणि फोनवर जास्त बोलत नाही'
I am phone and messaging unfriendly…. https://t.co/2hqe4rIIOO
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
तू स्वदेस, चक दे इंडिया यासारख्या चित्रपटांची निर्मिती का करत नाहीस? यावर शाहरुखनं रिप्लाय दिला, 'मी अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे, अजून किती करु? '
Bana toh do kitni baar banaoon?? https://t.co/2j7reFuuKA
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. पठाण व्यतिरिक्त शाहरुख बा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan Movie: लाल सिंह चड्ढा, ब्रह्मास्त्रनंतर आता पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी; हे आहे कारण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)