(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farzi Trailer Out: शाहिद अन् विजय सेतूपतीच्या 'फर्जी'चा ट्रेलर रिलीज; या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'फर्जी' (Farzi) ही क्राईम थ्रिलर सीरिज 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Farzi Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि साऊथमधील स्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हे 'फर्जी' (Farzi) या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी (13 जानेवारी) 'फर्जी'चा ट्रेलरही रिलीज झाला, या ट्रेलरमधील शाहिदच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले. या सीरिजमध्ये शाहिद एका नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे.
या सीरिजमध्ये शाहिद एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, जो खोट्या नोटा छापत असतो. तर विजय एका अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जो शाहिदचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. 'फर्जी'मध्ये विजय आणि शाहिद यांच्यासोबतच के के मेनन, राशि खन्ना, अमोल पालेकर, रेजिना कॅसॅंड्रा आणि भुवन अरोरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ही क्राईम थ्रिलर सीरिज 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
फर्जीच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिसत आहे की, शाहिद कपूरवर पैशांचा पाऊस पडत आहे. 'मुझे इतने पैसे कमाने हैं कि उसकी इज्जत ही ना करनी पडे', हा शाहिदचा डायलॉग ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकायला मिळतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये दिसतं की, शाहिद आणि त्याची टीम खोट्या नोटा छापतात. 2 मिनट 42 सेकंदाच्या या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
पाहा ट्रेलर:
गेल्या वर्षी शाहिद हा जर्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. आता शाहिदच्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या फर्जी या वेब सीरीजला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
फ्रर्जीच्या ट्रेलर लाँचला या सीरिजमधील कलाकारांनी हजेरी लावली. ट्रेलर लाँचचा व्हिडीओ शाहिदनं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'रुल्स नही पूरी गेम बदलनी है'
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Joshi Abhyankar Serial Murders : ज्या संक्रांतीला पुण्यावर खऱ्यारितीने संक्रांत आली...