Shah Rukh Khan : 'डंकी'नंतर शाहरुख झळकणार 'या' सिनेमात; 2024 गाजवणार किंग खान
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'डंकी' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून चाहत्यांना आता त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाची क्रेझ रिलीजनंतरही कायम आहे. शाहरुखच्या 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमांनी 2023 गाजवलं आहे. आता 'डंकी' हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन जमवत आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना दुसरीकडे किंग खानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 2023 या वर्षाची सुरुवात शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने चांगली केली. 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत वर्षाची सुरुवात चांगली केली. त्यानंतर त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमाही प्रदर्शित झाले. या सिनेमानेही 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. सध्या त्याचा 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
'डंकी'नंतर 'या' सिनेमात झळकणार किंग खान!
'डंकी' या बहुचर्चित सिनेमानंतर शाहरुख खान कोणत्या सिनेमात झळकणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षात रिलीज झालेल्या त्याच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'डंकी'चीदेखील 1000 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. वर्षभरात तीन सुपरहिट सिनेमे देणाऱ्या शाहरुखच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अभिनेत्याने अद्याप त्याच्या आगामी सिनेमाची अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. पण 'धूम 4' (Dhoom 4) या सिनेमासोबत किंग खानचं नाव जोडलं जात आहे.
'धूम 4'मध्ये झळकणार शाहरुख?
शाहरुख खानने अद्याप त्याच्या आगामी सिनेमाबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण अभिनेत्याचं नाव आता 'धूम 4'सोबत जोडलं जात आहे. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांना आता सुखद धक्का बसला आहे. 'धूम 4'साठी शाहरुखच योग्य असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 'धूम 4' या सिनेमात किंग खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या यशराज फिल्म्स (YRF) अभिनेत्यासोबत या सिनेमासंदर्भात बोलणी करत आहे. निर्माते लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील.
शाहरुखआधी 'धूम 4' या सिनेमासाठी सलमान खानचं नाव जोडलं गेलं होतं. सलमान आणि शाहरुख दोघेही यशराज फिल्म्सचा भाग आहेत. आता शाहरुख 'धूम 4' या सिनेमात दिसणार असल्याने चाहत्यांना या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या