Shah Rukh Khan: 'जर ट्रेलर खराब असेल तर सिनेमा बघायचा की नाही?' चाहत्याच्या प्रश्नाला किंग खाननं दिलं उत्तर
Shah Rukh Khan: नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केले. यामध्ये शाहरुखनं ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केले. यामध्ये शाहरुखनं ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.
शाहरुखला एका चाहत्यानं प्रश्न विचारला, 'तू गदर-2 पाहिला का?' या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, 'हो, मला आवडला.'
Yeah loved it!! https://t.co/Hd6hc6hi8Q
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 26, 2023
एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, मी माझ्या पत्नीसोबत जवानला बघायचा प्लॅन करत आहे, पण प्रत्येक वेळी तिच्यामुळे चित्रपट बघायला लेट होते. पठाण चित्रपटाच्या वेळी देखील असंच झालं. चित्रपट पहायला वेळेवर पोहचण्यासाठी काही टीप्स द्या प्लिज'
चाहत्याच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'बरं मित्रांनो, बायकोच्या संबंधित प्रश्न विचारु नका! मुझसे मेरी नहीं संभलती तुम अपनी समस्याएं भी मुझ पर डाल रहे हो!' शाहरुखनं पुढे ट्वीटमध्ये लिहिलं,'सर्व बायकांनो, कृपया टेन्शन न घेता जवान चित्रपट बघायला जा!'
Ok guys no more wife problem solving questions anymore!! Please!! Mujhse meri nahi sambhalti tum apni problems bhi mujh par daal rahe ho!!!! All wives please just go for #Jawan without stress https://t.co/SMQzeP89yS
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 26, 2023
'सर, जर ट्रेलर खराब असेल तर सिनेमा बघायचा की नाही? ' असा प्रश्न एका चाहत्यानं शाहरुखला विचारला. या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, भावा, आयुष्यात सकारात्मकता ठेव ना.... सोशल मीडिया टाइप वाटत आहेस तू... नकारात्मकता, नकारात्मकता. तू सकारात्मकता ठेव त्यामुळे अधिक आनंदी राहशील.'
Bhai life mein positivity rakh na….social media wala type lag raha hai….negativity negativity. Think positive u will be happier man. https://t.co/TFETLROUY2
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 26, 2023
सर सलमान भाईचा लेटेस्ट लूक पाहून वाटत आहे की तो जवानाचे प्रमोशन करत आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न देखील एका चाहत्यानं विचारला. या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'सलमान भाईला माझ्यावरच प्रेम दखवण्यासाठी कोणताही लूक करायची गरज पडत नाही. तो नेहमी माझ्यावर मनापासून प्रेम करतो…बस काह दिया सो काह दिया!!'
Salman bhai ko mujhe pyaar dikhaane ke liye koi look nahi karna padhta….woh dil se hi mujhe hamesha pyaar karte hain…bas keh diya so keh diya!! https://t.co/NjlXSDbQeW
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 26, 2023
एका फॅननं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, मला दोन बायका आहेत, एकीला जवान फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा आहे आणि दुसरीला फर्स्ट डे लास्ट शो बघायचा आहे. दिवसातून दोनदा कसा बघणार सर? कृपया मदत करा.' फॅनच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'जवानामध्ये देखील दोन नायिका आहेत. दोन्ही बायकांना सोबत घेऊन जा.'
#Jawan mein bhi doh heroines hain….Dono biwiyon ko saath mein le jaa….ek ek karke haath pakade lena jab main alag alag heroine ke saath screen pe aaoon!! #Jawan https://t.co/c0hJgcydws
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 26, 2023
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Jawan Song Zinda Banda: शाहरुखचा जबरदस्त डान्स आणि डॅशिंग लूक; 'जवान' मधील 'जिंदा बंदा' गाणं रिलीज