एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: शाहरुखचे चाहते मेकअप रुममध्ये आठ तास लपले होते; मन्नत बंगल्याच्या मॅनेजरची माहिती

शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते त्याला भेटण्यासाठी मन्नत या बंगल्यात गुपचूप घुसले आणि सुमारे आठ तास शाहरुख खानच्या मेकअप रूममध्ये वाट पाहत बसले.

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) वांद्रे (Bandra) बँडस्टँड येथील मन्नत या बंगल्यामध्ये अवैध पद्धतीनं घुसण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात काही लोकांनी केला. या प्रकरणी गेल्या आठवड्यात दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही आरोपी शाहरुख खानला भेटण्यासाठी मन्नत या बंगल्यात गुपचूप घुसले आणि सुमारे 8 तास शाहरुख खानची मेकअप रूममध्ये वाट पाहत बसले.

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची मॅनेजर कॉलीन डिसूझानं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, बंगल्यात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तिला फोन करून दोन लोक बंगल्यात घुसल्याची माहिती दिली. दोन्हीही आरोपी शाहरुखच्या बंगल्यातील तिसर्‍या मजल्यावर असलेल्या मेकअप रूममध्ये पोहोचले होते आणि रात्री तीन वाजल्यापासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत शाहरुख खानची वाट पाहत बसले होते.

एफआयआरनुसार, मन्नतच्या हाऊसकीपिंग स्टाफमध्ये काम करणारा सतीश जेव्हा तिथे साफसफाई करण्यासाठी मेकअप रुममध्ये पोहोचला तेव्हा त्याला हे दोघे तिथे लपलेले दिसले. त्यानंतर सतीशने दोघांनाही तेथून लॉबीमध्ये नेले आणि अचानक या दोघांना तिथे पाहून शाहरुख खान आश्चर्यचकित झाला. त्यानंतर मन्नत बंगल्याचे गार्ड्स आले आणि त्यांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलेल्या आरोपींचे नावे पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी असून दोघेही गुजरातमधील भरूच येथील रहिवासी आहेत.
 
वांद्रे पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही तपासणी केली असता काही संशयास्पद आढळले नाही, त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली, त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी येऊन त्यांना जामीन मिळवून दिला. दोघांना कोर्टातून 10 हजार रुपयांवर जामीन मिळाला.

शाहरुख खानचे चित्रपट  

शाहरुखचा पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. लवकरच शाहरुखचा जवान आणि डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shah Rukh Khan : शाहरुखची सुरक्षा धोक्यात; मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले 'मन्नत'मध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget