एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : बॉलिवूड स्टार शाहरुख आणि आर्यन खानचे जबाब नोंदवण्याची शक्यता; वानखेडेंनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी CBI जबाब नोंदवणार

Shah Rukh Khan Aaryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि आर्यन खानचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

Shah Rukh Khan Aaryan Khan : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआय बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

समीर वानखेडे यांनी खासगी व्यक्तीमार्फत रोख रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. आर्यन खानला अटक झाल्यानंतर 25 कोटींची मागणी करून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. आता समीर वानखेडे यांनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआय बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे जबाब नोंदवणार आहे. 

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणातील बहुतेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत आणि खान पिता पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांची अधिक स्पष्टता आणि स्पष्ट चित्रे दिसून येतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि आर्यन खान यांना जबाबासाठी कधी बोलावले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सीबीआय त्यांना जबाबासाठी बोलवू शकते, हे सूत्रांनी सांगितले आहे. 

समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयने अनेक आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका व्हावी यासाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते. पण शेवटी 18 कोटी रुपयांत ही डील पक्की झाली होती, असे सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटलं होतं. तसेच वानखेडेंच्या वतीने किरण गोसावीने 50 लाख रुपयांचं आगाऊ पेमेंटही घेतलं असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. 

आर्यन खान प्रकरण काय आहे? (What Is Aryan Khan Cruise Drugs Case)

एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्यन खानची निर्दोष सुटका झाली. दरम्यान समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भ्रष्टाचारासह त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुखने समीर वानखेडेंना 50 लाखांची लाच दिली? किंग खानला आरोपी करा, विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget