एक्स्प्लोर

कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्यावर शबाना आझमींचं प्रत्युत्तर

शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्याक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. मात्र पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी कार्यकम रद्द केला होता. यावरुन कंगनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. देव आपलं भलं करो, असं शबाना आझमी यांनी कंगनाला उत्तर दिलं आहे. शबाना आझमी आणि जावेद अख्तर देशद्रोही आहेत, असं कंगना म्हणाली होती. शबाना आझमी एका मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांना कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्यावर प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या, जेव्हा देश एकत्र होऊन पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत दु:ख प्रकट करत आहे. हल्ल्याचा निषेध करत आहे, अशा वेळी वैयक्तिक हल्ल्याला काही महत्व आहे का? देव आपलं भलं करो, असं शबाना आझमी म्हणाल्या. शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्याक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. मात्र पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी कार्यकम रद्द केला होता. यावरुन कंगनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही : कंगना रनौत जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर बोलताना कंगनाने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला होता. जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला होता. फिल्म इंडस्ट्री अशा देशद्रोही लोकांनी भरली आहे, असं ती म्हणाली होती. नवज्योत सिंह सिद्धूंवरही निशाणा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असं म्हणाले होते. यावर कंगनाने नाव न घेता सिद्धूंवर निशाणा साधला. ती म्हणाली, जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत. असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे, अशा शब्दात तिने सिद्धूंच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget