seema deo: सीमा देव यांच्या निधाननं चित्रपटसृष्टीवर शोककळा; कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वाहिली श्रद्धांजली
अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमा देव (Seema Deo) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आज निधन झाले. सीमा देव यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सीमा देव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
अश्विनी भावेची पोस्ट
अभिनेत्री अश्विनी भावेनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'सीमा ताईंच्या च्या निधनाची बातमी ऐकुन खूप दुःख होत आहे. सीमाताईंचे पडद्यावरचे लोभस रूप आणि त्यांच्या तरल अभिनयाने मी लहान वयातच खूप प्रेरित झाले होते. व्यवसाय आणि कौटुंबिक जबादारी यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी स्त्री कलाकारांना एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि अजरामर भूमिकांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. स्त्रीच्या आयुष्यातल्या सर्वच भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. रमेश काकांवर आणि मुला-नातवंडांवर अपार प्रेम केलं.
सीमा ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या. अजिंक्य, अभिनय आणि कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची ताकद लाभो आणि मृतात्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरा कडे प्रार्थना करते. ओम शांती !'
View this post on Instagram
अभिनेत्री हेमांगी कवीनं देखील सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा 1 रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले.Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं! सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम!'
View this post on Instagram
'सीमा ताईंना बघून मला माझी आई माणिक वर्माची आठवण येते. आईची जी सोज्वळ, सुशील, प्रेमळ, मायाळू प्रतिमा होती तशाच सीमाताई होत्या.' अशी पोस्ट अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी केली आहे.ॉ
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
