एक्स्प्लोर

‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

नवी दिल्ली : ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. प्रिया आणि दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांच्याविरोधातील मुंबई आणि हैदराबादमधील तक्रारीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारसह तक्रारदारांकडून उत्तरही मागितले आहे. प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्यावरुन वाद सुरु आहे. यावरुन मुंबई, हैदराबादमध्ये प्रिया आणि दिग्दर्शक ओमर यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर या तक्रारी रद्द करण्यासाठी प्रियासह दिग्दर्शकाने सुप्रीम कोर्टाचा दार ठोठावला होता. आज सुप्रीम कोर्टाने या तक्रारींना स्थगिती दिली आहे. प्रिया वारियरने याचिकेत काय म्हटले आहे? आपल्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करत प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीररित्या व्यावसाय करण्याचा घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार आहे. गाण्याचा चुकीचा अनुवाद केल्याचा आरोप करत तक्रारदार आमच्या मुलभूत अधिकारांचं हनन करत आहेत, असे प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. प्रकरण काय आहे? ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन वाद झाला आहे.हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. काय आहे व्हिडिओ? ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातील हे गाणं आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं असून व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत. कोण आहे प्रिया प्रकाश वारियर? प्रिया प्रकाश वारियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे. पाहा गाण्याचा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget