Sankarshan Karhade: संकर्षणनं अमेरिकेत बनवला फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'त्यांच्या स्वयंपाकघरात...'
नुकताच संकर्षणनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अमेरिकेमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे.
Sankarshan Karhade: अभिनेता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. तसेच संकर्षण हा सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करतो. नुकताच संकर्षणनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अमेरिकेमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे.
संकर्षणनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो फोडणीचा भात बनवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये संकर्षणनं सांगितलं की तो अमेरिका राजमाने यांच्या घरी राहात आहेत. त्यांच्या घरात त्यानं फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी बनवली आहे.
संकर्षणनं शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'आम्ही सारे खवय्ये इन अमेरिका, अमोल राजमाने आणि शुभदा राजमाने ह्यांच्या घरी राहातोय. त्यांच्या स्वयंपाकघरांत आज लूडबूड केली …. मज्जा आली !'
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
संकर्षणनं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 'मस्त रेसिपी' अशी कमेंट संकर्षणनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आमच्या घरी कधी येणार ??'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
संकर्षणनं हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. नियम व अटी लागू, तू म्हणशील तसं या नाटकांमध्ये संकर्षणनं काम केलं. संकर्षणनं या नाटकांचे प्रयोग विविध ठिकाणी करत असतो. 2016 मध्ये त्यानं नागपूर अधिवेशन या चित्रपटात काम केलं. त्यानं वेडिंग चा शिनेमा या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉमेडी चित्रपटात दिलीप शहाणे ही भूमिका साकारली.
संकर्षणचा आगामी चित्रपट
संकर्षण हा तीन अडकून सीताराम या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), आलोक राजवाडे (Alok Rajwade) हे देखील भूमिका साकारणार आहेत. तीन अडकून सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादीनं पुष्कराज ही भूमिका साकारली आहे. तर संकर्षण कर्हाडेनं या चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. संकर्षणच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या: