Salman Khan: 25 वर्षांत एकदाही डिनरला गेलो नाही, भाईजानची शॉकिंग कबुली, सलमाननं स्टारडममागच्या आयुष्याबद्दल म्हणाला...
Salman Khan: अनेक वर्षांपासून तर बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मात्र या यशामागे त्याची अत्यंत व्यस्त जीवनशैली असल्याचं त्यानं सांगितलं.

Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान जितका ग्लॅमरस आणि दमदार पडद्यावर दिसतो तितकाच त्याचं खासगी आयुष्यही कायम चर्चेत आणि धावपळीचं असतं. नुकताच सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये सलमानने आपल्या सुपरबिझी लाईफस्टाईलबद्दल असं काही सांगितलं की चाहत्यांनाही धक्का बसलाय. "गेल्या 25 वर्षांपासून मी बाहेर डिनरलाही गेलो नाहीय. जाण्याची संधीच मिळाली नाही. शूटिंग ते घर, घर ते शूटिंग, घर ते एअरपोर्ट, एअरपोर्ट ते हॉटेल आणि हॉटेलमधून इथे. एवढंच माझं आयुष्य आहे." असं सलमान म्हणाला.
सलमान खान हा बॉलीवूडमधील अशा सुपरस्टार्सपैकी एक आहे ज्याच्या एका शब्दावर कामे होतात. सलमानच्या केवळ नावावर एखादा चित्रपट हिट होतो. अनेक वर्षांपासून तर बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मात्र या यशामागे त्याची अत्यंत व्यस्त जीवनशैली असल्याचं त्यानं सांगितलं.
काय म्हणाला सलमान?
अलीकडेच सौदी अरेबियातील जेद्दा येथील रेड सी फिल्म फेस्टिवल मध्ये सलमान सहभागी झाला होता. यावेळी आपल्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यावरही तो बोलला. तो म्हणाला, गेल्या 25 ते 26 वर्षांपासून तो प्रचंड बिझी आहे. या काळात त्याला कुटुंबासोबत बाहेर डिनरला जाण्याची ही संधी मिळालेली नाही. " माझ्या आयुष्यातील बहुतांश वेळ मी कुटुंबीय आणि मित्रांसोबत घालवला आहे. त्यातील बरेच जण आता आपल्यात नाहीत. फक्त 4 ते 5 जुने मित्र अजून सोबत आहेत. गेली 25 - 26 वर्ष झाली, मी कुठेही बाहेर डिनरला गेलो नाही. शूटिंग वरून घर, घरातून परत शूटिंग, घरातून विमानतळ विमानतळावरून हॉटेल आणि हॉटेलवरून इथे एवढंच माझं आयुष्य आहे"
तो पुढे म्हणाला,' आणि मला याचा अजिबात त्रास नाही. जर फिरणं भटक न करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी नको. पण मला तसे आयुष्य नको आहे. प्रेक्षक मला जेवढं प्रेम आणि सन्मान देतात, त्यासाठीच मी ही मेहनत करतोय. कधी कधीही आत्म समाधान मिळतं पण पुढे काय येणार आहे याचा आनंदही होतो."
सलमान खानचे पुढचे प्रोजेक्ट कोणते?
सलमान खान सतत टीव्ही आणि थेटरच्या माध्यमातून चहा त्यांच्या भेटीला येत असतो. यावर्षी सिकंदर नंतर तो बॅटल ऑफ गलवानच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. याशिवाय तो दर आठवड्याला बिग बॉस 19 चा वीकेंड का वारमध्येही झळकला. आता त्याने हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण केले असून पुढील चित्रपट ' किक 2' साठी तो तयारी करत आहे. बिग बॉस 19 च्या फिनाले दरम्यान सन्माननीय स्वतः या चित्रपटाचे अधिकृत घोषणा केली.























