एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सिनेमाच्या शीर्षकाचा वाद, कंगनाचा संताप, म्हणाली सलमानच्या सिनेमाचे नाव 'मेंटल' असलेलं चालतं...

सलमान खानच्या एका सिनेमाचे नाव 'मेंटल' असं होतं. हा सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमाचा रिमेक होता, असेही तिने सांगितले. शीर्षकात बदल केल्याने विशेष फरक पडणार नाही, असेही कंगनाने म्हटले आहे.

मुंबई : कंगना रनौत आणि राजकुमार राव यांच्या आगामी 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या शीर्षकावरून चांगलाच वाद पेटला आहे. आधी या सिनेमाचे नाव 'मेंटल है क्या' असं होतं. या नावाला विरोध केल्यानंतर अखेर नाव बदलून सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मात्र या प्रकारावरून सिनेमाची मुख्य अभिनेत्री कंगना चांगलीच चिढली आहे. सिनेमाचे शीर्षक बदलावे लागणे हा चित्रपट क्षेत्रातील घराणेशाही आणि सत्तेचा परिणाम आहे, असे कंगनाने म्हटले आहे.  कंगनाशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे कहाणी लोकांना त्रास होतो. मी आउटसायडर असल्याने श्वास जरी घेतला तरी काही लोकांना त्रास होतो, असे कंगनाने म्हटले आहे. सलमान खानच्या एका सिनेमाचे नाव 'मेंटल' असं होतं. हा सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमाचा रिमेक होता, असेही तिने सांगितले. शीर्षकात बदल केल्याने विशेष फरक पडणार नाही, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगना रनौत आणि राजकुमार राव अभिनित बहुप्रतीक्षित आणि वादग्रस्त चित्रपट 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर काल रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये कंगना आणि राजकुमार या दोघांच्याही अनोख्या अभिनयाची छाप पाहायला मिळत आहे. 'मेंटल है क्या?' चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे सिनेमाचे नाव बदलून ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर 19 जून रोजीच रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाच्या नावाला अनेकांनी विरोध केल्यामुळे ट्रेलर लॉन्चिंगची तारीख निर्मात्यांना पुढे ढकलावी लागली होती. 'ट्रस्ट नो वन'अर्थात कुणावरही विश्वास ठेवू नका अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. सिनेमाच्या कथेत कंगना आणि राजकुमार हे एका खुनामध्ये संशयित आरोपी असल्याचे निदर्शनास येत आहे. सिनेमात दोघेही काहिशे विक्षिप्त असल्याचंही दिसून येत आहे. चित्रपटात कंगनाच्या कॅरेक्टरचे नाव 'बॉबी' तर राजकुमार यावं 'केशव' नावाच्या इसमाची भूमिका करत आहे. यामध्ये बॉबी बोल्ड अंदाजात दाखवली आहे तर राजकुमार राव एक सामान्य व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका दुहेरी हत्येच्या प्रकरणात पोलिसांना बॉबी आणि केशववर संशय असतो. यावर आधारीत ही कथा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. रोमांस, कॉमेडी आणि सस्पेंसचा जोरदार तडका चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रोमांस, कॉमेडी आणि सस्पेंसचा जोरदार तडका दिला आहे. हा चित्रपट एकटा कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मिती आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेमालुदी ने केलं आहे. आगामी 26 जुलै रोजी हा सिनेमा संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. काय होता वाद? एकता कपूरच्या 'मेंटल है क्या?' या सिनेमाचे पोस्टर एप्रिलमध्ये रिलीज झाले होते. यानंतर चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध दर्शवला होता. दरम्यान, हा चित्रपट मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या प्रती संवेदनशील असल्याचं एकतानं सांगितलं होतं.  या चित्रपटात कोणत्याही प्रकारे मानसिक आजार असलेल्या समाजाला कमी लेखण्यात आलेलं नाही. तसंच चित्रपटाच्या नावावरून कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. हा चित्रपट मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या बाबत संवेदनशील आहे. आपल्यातील वेगळेपणाचा आनंद घेण्यासाठी आणि आपलं व्यक्तिमत्व स्वीकारण्यासाठी हा फिक्शनल थ्रीलर चित्रपट प्रोत्साहित करतो, असं एकतानं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींना पत्र  लिहिलं एखाद्या चित्रपटाचं नाव असं असणं असंवेदनशील असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. चित्रपटाचं नाव बदलण्यासाठी डॉक्टरांनी सोशल मीडियावर मोहीम देखील सुरू केली होती. इंडियन सायकॅट्री असोसिएशनने सेन्सॉर बोर्ड आणि पंतप्रधान मोदींना पत्र देखील लिहिलं होतं. तसंच याबाबत कोर्टात जनहित याचिका देखील दाखल केली होती. पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget