एक्स्प्लोर

सलमान खानच्या केअर टेकरला अटक, जबरी चोरी करुन 29 वर्ष पोलिसांना देत होता गुंगारा

मुंबईच्या वरळी येथे सन 1990 मध्ये शक्ती राणा आणि त्याच्या साथीदार एका घरात घुसले. घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि किंमती वस्तू घेऊन पसार झाले होते.

मुंबई : मागील 29 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका भामट्याला बुधवारी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा भामटा अभिनेता सलमान खानच्या गोराई बीच येथील फार्महाऊस मध्ये आपली ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. अखेर पोलिसांनी त्याचा भांडाफोड करत त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव शक्ती सिद्देश्वर राणा आहे. आरोपीने 1990 मध्ये आपल्या साथीदारांसह एका व्यक्तीच्या घरात घुसून जबरी चोरी करत मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. कालांतराने तो जमिनीनावर मुक्त झाला होता. परंतु या नंतर मात्र तो न्यायालयात नियमितपणे हजर न राहता आपली ओळख लपवून गोराई बीच येथील सलमानच्या फार्महाऊसमध्ये 15 वर्षांपासून राहत होता. सलमानच्या बंगल्यावर गेल्या 15 वर्षांपासून शक्ती हा केअर टेकर म्हणून काम करीत होता. सध्या शक्ती याचे वय 62 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईच्या वरळी येथे सन 1990 मध्ये शक्ती राणा आणि त्याच्या साथीदार एका घरात घुसले. घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि किंमती वस्तू घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी शक्ती आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर शक्ती फरार झाला तो कधीच न्यायालयात सुनावणीसाठी आला नाही. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांकडील पत्त्यावर तो सापडला नाही. पोलिसांनी खबरे, तांत्रिक पुरावे या आधारे शक्ती गोराई परिसरात राहात असल्याचे समजले. गुन्हे शाखेच्या पथकाने गोराईचा परिसर पिंजून काढला त्यावेळी येथील एका बंगल्यात तो सापडला. चौकशीमध्ये हा बंगला सलमान खान याचा असल्याचे स्पष्ट झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
Jennifer Winget Married: 41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल
41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल
Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Embed widget