Salman Khan : Salman Khan ला सोफ्यावरुन उठताच येईना, हातांचा आधार घेऊन उठून उभा राहिला, VIDEO पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर!
Salman Khan : नुकताच सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याचा मोठा चाहता वर्ग आहे. तरुणांमध्येच नव्हे तर सलमान खान हा तरुणींमध्येही चांगलाच लोकप्रिय आहे. अनेक तरुणींसाठी तो क्रश आहे. आता मात्र नुकताच सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
भाईजानचा व्हिडीओ व्हायरल...
सोशल मीडियावर 28 ऑगस्ट रोजी सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहताच त्यांनी चिंता व्यक्त केली. एका कार्यक्रमासाठी हजर असलेला सलमान खान सोफ्यावर बसला आहे. मात्र, त्याला सोफ्यावरून उठताना त्रास होत असल्याचे दिसून आले. सलमान खानची ही अवस्था पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या क्रशचे आता वय होत चालले असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.
Hum saath saath hai reunion Prem Meets Dr Preeti Salmaan khan meets Sonali bendre ♥️#SalmanKhan #SonaliBendre pic.twitter.com/tAlyvNOnIR
— King Kohli 👑 (@CricketfanO9) August 28, 2024
सलमान खानसाठी चाहते हैराण...
सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसल्याने सोफ्यावर बसलेला सलमान खान उठून उभा राहतो. मात्र, त्याला सहजपणे उठता येत नाही. उठताना त्याला त्रास जाणवतो. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी सलमानच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.
एका युजरने म्हटले की, 'ओह माय गॉड...आमचा आवडता हिरा म्हातारा झाला आहे..' तर, आणखी एका युजरने म्हटले की, कम ऑन यार..आता तो 58 वर्षांचा आहे...तरीदेखील तो असा दिसत आहे. आणखी एका युजरने म्हटले की, आमच्या लहानपणीचा आवडीचा अभिनेता आता वयस्कर होत आहे आणि आम्ही देखील...लक्षात ठेवा सगळं काही कायमस्वरुपी नसतं.
सोशल मीडियावर आणखी एका युजरने म्हटले की, भाई आता थकल्यासारखा वाटतो आणि म्हाताराही. आणखी एकाने म्हटले की, सलमानची प्रकृती चांगली नसतानाही तो या कार्यक्रमासाठी हजर राहिला अशी चर्चा आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन...
सलमान खानने 'बच्चे बोले मोरया' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणावी, पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. त्याशिवाय मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सलमान खानने एक गाणे गायले आणि डान्सही केला.