एक्स्प्लोर

'दबंग 3'मध्ये सलमानसोबत महेश मांजरेकरांची कन्या सई झळकणार

'दबंग 3' मध्ये सलमानसोबत फ्लॅशबॅक सीन्समध्ये सई दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानसोबत सईच्या दृश्यांचं चित्रीकरण झाल्याची माहिती आहे.

मुंबई : महेश मांजरेकर यांची धाकटी कन्या सई बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्री घेणार आहे. सुपरस्टार सलमान खानसोबत 'दबंग 3' मधून सई मांजरेकर मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. 'दबंग'च्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या तिसऱ्या आवृत्तीत सलमानसोबत सईची जोडी जमणार आहे. महेश मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमी 'दबंग 3' मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अश्वमीला अभिनयाची गोडी नसल्याने तिच्याऐवजी धाकट्या बहिणीची वर्णी लागली. 'दबंग 3' मध्ये सलमानसोबत फ्लॅशबॅक सीन्समध्ये सई दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानसोबत सईच्या दृश्यांचं चित्रीकरण झाल्याची माहिती आहे. दोघांवर एक गाणंही चित्रित होण्याची शक्यता आहे. 'दबंग 3'च्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभूदेवा यांच्या खांद्यावर आहे. 'दबंग' सीरीजमधील पहिल्या भागाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने केलं होतं, तर दुसऱ्या भागाचं सलमानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान याने. तिसऱ्या भागात सलमान विशीतील पोलिस चुलबुल पांडेची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी सलमानने वजन घटवलं आहे. सध्या साताऱ्यातील फलटणमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. या ठिकाणी चाहत्यांच्या तोबा गर्दीमुळे चित्रीकरणात अडथळे निर्माण झाले होते. सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत दिसेल, तर अरबाज खान मख्खीची भूमिका साकारेल. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपही चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्याची व्यक्तिरेखा खलनायकाची नसून नायकाला समांतर अशी नकारात्मक भूमिका असेल, असं निर्मात्यांनी सांगितलं. 20 डिसेंबर 2019 रोजी 'दबंग 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget