एक्स्प्लोर

सलीम खान यांच्या 'त्या' प्रश्नामुळे 'मन्नत' सलमानऐवजी शाहरुखच्या मालकीचं!

'इतक्या मोठ्या घरात काय करणार?' असा प्रश्न वडिलांनी विचारल्यामुळे मी मन्नत बंगल्याच्या खरेदीचा विषय सोडून दिला होता, असं सलमान खानने सांगितलं.

मुंबई : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचं निवासस्थान 'मन्नत' पाहण्यासाठी देशभरातून चाहते मुंबईत गर्दी करतात. दोनशे कोटींच्या घरात किंमत असलेलं शाहरुखचं हे आलिशान घर कदाचित बॉलिवूडच्या दुसऱ्या सुपरस्टारच्या मालकीचं असतं. अभिनेता सलमान खानचा 'मन्नत'वर डोळा होता, मात्र वडिलांनी हटकल्यामुळे सलमानने बंगल्याच्या खरेदीचा नाद सोडला होता. सलमान आणि शाहरुख खान यांच्या यारी-दोस्तीचे किस्से बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मुंबईत वांद्र्याच्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर शाहरुखच्या आधी सलमानची नजर पडली होती. सलमानने वडील अर्थात प्रख्यात लेखक सलीम खान यांचं मत विचारात घेतलं. मात्र सलीम खान यांनी लेकाचं म्हणणं धुडकावून लावलं. 'इतक्या मोठ्या घरात काय करणार?' असा प्रश्न वडिलांनी विचारल्यामुळे मी विषय सोडून दिला, असं सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 'आता मला हाच प्रश्न शाहरुखला विचारायचा आहे, की तू इतक्या मोठ्या घरात करतोस काय?' असं सलमान गमतीत म्हणतो. सलमान वांद्र्यातच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. शाहरुखने एका रेडिओ शोला दिलेल्या मुलाखतीत बंगला खरेदी मागच्या भावना सांगितल्या होत्या. 'मी दिल्लीहून आलो आहे. दिल्लीत कोठी म्हणजेच बंगल्याची पद्धत आहे. मुंबईत मात्र फ्लॅट किंवा अपार्टमेंट सिस्टम. दिल्लीत एखादी मध्यमवर्गीय व्यक्तीही छोट्या बंगल्यात राहते' असं शाहरुखने सांगितलं होतं. 'मी मुंबईला आलो, तेव्हा माझं लग्न झालं होतं. मी एका छोट्याशा खोलीत गौरीसोबत राहत होतो. त्यावरुन माझी सासू मला सारखी डिवचायची. जेव्हा मी मन्नत पाहिलं, तेव्हा आधी मला दिल्लीतल्या कोठींचीच आठवण झाली. त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता मी माझ्या आयुष्यातील सर्वात महागडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.' असंही शाहरुखने सांगितलं होतं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Embed widget