एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमान खान 'या' अभिनेत्याला लाँच करणार
सलमान आपल्या खास मित्राचा मुलगा झहीर इक्बालला आपल्या चित्रपटातून लाँच करणार आहे
मुंबई : सलमान खान सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांना कोड्यात टाकत असतो. यावेळी सलमानने एका लहान मुलासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. हा मुलगा कोण आहे, हे ओळखण्याचं आव्हानच सलमानने चाहत्यांना दिलं होतं.
हा चिमुरडा म्हणजे नवोदित अभिनेता झहीर इक्बाल असल्याचं स्पष्ट झालं आहे. सलमानने ट्विटरवर झहीरचा फोटो शेअर केला आहे.
सलमानची सहनिर्मिती असलेल्या चित्रपटातून इक्बाल पदार्पण करणार आहे.
'ही मुलं कशी भरभर मोठी होतात. काहीही होऊदे, नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करत राहा #झहिरो.. उंच भरारी घे, पण ज्यांच्यावर प्रेम करतोस आणि ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, त्यांच्यासाठी कायम मागे झुकत राहा. आदर आणि एकनिष्ठता या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे कायम लक्षात ठेव' असं कॅप्शन देत सलमानने झहीरचे फोटो शेअर केले आहेत.
झहीरचे वडील इक्बाल रत्नासी हे सलमानचे खास मित्र आहेत. 'तरुणपणी इक्बाल माझी 'बँक' होते. अजूनही मी त्यांचे 2011 रुपये देणं लागतो. नशिब ते व्याज घेत नाहीत. मुलाला लाँच करत आहे, तर वडिलांचा फोटो पोस्ट करायलाच हवा ना. खूपच आवडलाय हा फोटो' असं ट्वीट सलमानने केलं आहे.How these kids grow up so soon... ALWAYS keep giving your best #ZAHERO no matter what. Stand tall and always bend backwards for those u love and those who love u, Yeh yaad rakhna that the most important thing in life is Respect and Loyalty. @iamzahero pic.twitter.com/xmn3RXklRk
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 31, 2018
'उद्या याला लाँच करत आहे. उद्या बघुया हा मुलगा आज कसा दिसतो' असं कॅप्शन देत सलमानने हा फोटो काल शेअर केला होता. सलमानने ना कोणाला मेन्शन केलं, ना कुठला हॅशटॅग दिला. त्यामुळे चाहत्यांनी पुन्हा तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली.N this is my childhood frnd Iqbal, as a teen he was my bank, I still owe him 2011rs . thnk God he did not take interest 😁 bete ko launch Kar raha hoon toh baap ka post toh karsakta hoon na. Lv the pic. pic.twitter.com/FMSXNKmaME
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 31, 2018
झहीर आणि अभिनेत्री सना सईद एकमेकांना डेट करत असल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सना म्हणजे शाहरुख-काजोलच्या कुछ कुछ होता है (1998) मधली छोटी अंजली. सनाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ दि इयर'मध्येही भूमिका साकारली होती.Being Launched Tomorrow ... KAL dekhte hai yeh ladka AAJ kaise dikhta hai ... pic.twitter.com/2VpmWvD9J8
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement