एक्स्प्लोर
Advertisement
सलमानने अखेर 'लव्हरात्री' सिनेमाचं शीर्षक बदललं!
चहूबाजूच्या टीकेनंतर सलमान खानने आयुष शर्मा आणि वरिना हुसैनच्या आगामी सिनेमाचं 'लव्हयात्री' असं नामकरण केलं आहे.
मुंबई : सलमान खानची निर्मिती असलेल्या आगामी 'लव्हरात्री' चित्रपटाचं शीर्षक अखेर बदलण्यात आलं आहे. चहूबाजूच्या टीकेनंतर सिनेमाचं 'लव्हयात्री' असं नामकरण करण्यात आलं आहे. सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
सिनेमाचं नाव बदलत असल्याची घोषणा सलमानने ट्विटरवरुन केली. नवरात्र या हिंदू सणाशी नामसाधर्म्य असल्यामुळे सिनेमाविरोधात टीकेची झोड उठली होती. त्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
सलमानने 'लव्हयात्री' असं सिनेमाचं नवीन नाव जाहीर करताना 'ही स्पेलिंग मिस्टेक नाही' असं नमूद केलं आहे. मात्र नाव बदलण्याचं कारण लिहिणं त्याने टाळलं आहे. लव्हयात्री येत्या पाच ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
'लवरात्रि - यह कहानी है प्यार और मोहब्बत की' असं कॅप्शन आधी देण्यात आलं होतं. आता 'लव्हयात्री - अ जर्नी ऑफ लव्ह' असं शीर्षक देण्यात आलं आहे.
सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हयात्री'ची निर्मिती करण्यात येत आहे. लव्हयात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. चित्रपटात राम कपूर, रॉनित रॉय हे कलाकारही झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. लव्हयात्री हा चित्रपट आयुष शर्मासाठी मोठा ब्रेक मानला जात आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना अहिल हा मुलगा आहे. संबंधित बातम्या :This is not a spelling mistake... #loveyatri #lovetakesover...@SKFilmsOfficial @aaysharma @Warina_Hussain @abhiraj21288 @TSeries pic.twitter.com/WcI5tbXkke
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 18, 2018
मुलगी मिळाली पण..., सलमान खानचं ट्विटरवरुन स्पष्टीकरण
सलमानच्या 'लव्हरात्री'तून मेहुणा आयुष शर्माचं पदार्पण
वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चं पोस्टर सलमानकडून रिलीज वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच चकाचक प्रेम कहाणी, सलमान निर्मित 'लव्हरात्री'चा ट्रेलरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
निवडणूक
बातम्या
Advertisement