एक्स्प्लोर
Mahayuti dispute : महायुतीत बिघाडी? आगामी निवडणुकांसाठी Eknath Shinde यांचा शिलेदारांना आदेश
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) गोटात हालचालींना वेग आला आहे. 'युती होईल तेव्हा होईल, मात्र स्वतंत्र लढण्यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात करा,' अशा स्पष्ट सूचना शिंदे यांनी त्यांच्या आमदार, मंत्री आणि जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये महायुतीतील (Mahayuti) जागावाटपाचे गणित जुळणे कठीण असल्याचा सूर शिवसेनेच्या बैठकीत उमटला. रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीधर्म पाळला जाणार की शिवसेना स्वबळाचा नारा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement

















