एक्स्प्लोर

गूड न्यूज... 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आपला लाडका दबंग भाईजान; सलमान खानचा कॅमिओ कन्फर्म!

Salman Khan Cameo: सलमान खानच्या अडचणी आणखी वाढायला नकोत, म्हणून सलमान खानचा कॅमिओ कॅन्सल करण्यात आला होता. पण, सलमान खाननं शुटिंग पूर्ण केलं असून तो 'सिंघम अगेन'मध्ये कॅमिओ करताना दिसणार असल्याचं कन्फर्म झाल्याचं सांगितलं जात आहे. 

Salman Khan Cameo in Singham Again : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन' (Singham Again) दिवाळीत (Diwali 2024) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी अॅक्शनचा धमाका असणार आहे. तसेच, अनेक स्टार्सचे कॅमिओ देखील असणार आहेत. अशातच सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये सलमान खानचा (Salman Khan) कॅमिओ पक्का झाला आहे. दबंग स्टार सलमान खान या ॲक्शन मूव्हीमध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

यंदाच्या दिवाळीला रिलीज होणारा 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. यंदाच्या वर्षातला बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठे दोन चित्रपट एकमेकांसमोर येणार आहेत. दरम्यान, मंगळवारी अशा काही बातम्या समोर येत होत्या की, 'सिंघम अगेन'मध्ये सलमान खानचा कॅमिओ कॅन्सल करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि त्यानंतर बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आलेला सलमान खानच्या अडचणी आणखी वाढायला नकोत, म्हणून सलमान खानचा कॅमिओ कॅन्सल करण्यात आला होता. पण, सलमान खाननं शुटिंग पूर्ण केलं असून तो 'सिंघम अगेन'मध्ये कॅमिओ करताना दिसणार असल्याचं कन्फर्म झाल्याचं सांगितलं जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

पिंक व्हिलाच्या वृत्तानुसार, मल्टीसारर फिल्म सिंघम अगेनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दबंग भाईजान कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमान खाननं सिंघम अगेनमधील कॅमिओचं शुटींग पूर्ण केलं आहे. बऱ्याच काळानंतर भाईजानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. 

रोहित शेट्टीच्या पोलिस युनिव्हर्ससोबत चुलबुल पांडेची केमिस्ट्री

सिंघम अगेनमध्ये सलमान खान चुलबूल पांडे म्हणून एन्ट्री घेणार आहे. आपल्या लाडक्या भाईजानला पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. रोहित शेट्टीच्या पोलीस युनिव्हर्ससोबत चुलबुल पांडेची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. 

अभिनव कश्यपचा 'दबंग' सुपर डुपर हिट 

अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपनं दिग्दर्शित केलेल्या 'दबंग'मध्ये सलमान खान पहिल्यांदा चुलबुल पांडे म्हणून दिसला होता. 'दबंग'च्या जबरदस्त यशानंतर सलमान खान 'दबंग 2' आणि 'दबंग 3' मध्येही चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील सलमान खानच्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला. 

अजय देवगण, करीना कपूरसोबत सलमान खान एकत्र दिसणार 

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सुपरकॉप टीममध्ये रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अजय देवगण, करीना कपूरसोबतच सलमान खानचा कॅमिओ निश्चितच एक उत्तम ट्रीट असणार आहे. येथे लोकांना त्यांचे आवडते चेहरे कथेत एकत्र पाहता येतील. 'बाजीराव सिंघम' आणि 'चुलबुल पांडे' यांना एकत्र पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.

सिंघम अगेनच्या ट्रेलरलाही जबरदस्त रिस्पॉन्स 

दरम्यान, यासोबतच कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, विद्या बालन स्टारर 'भूल भुलैया 3' हा चित्रपटही 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार असल्याचं समजतंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Listठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी,65 उमेदवारांचा यादीत समावेशMahavikas Aghadi PC : शिवसेनेची पहिली यादी जाहीर! महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदSanjay Raut On MVA Seat Allocation : 85-85-85 मविआचा फॉर्मुला, आमचं जागावाटप सुरळीत : संजय राऊतSanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
Embed widget