एक्स्प्लोर
हॉलिवूड स्टार सलमा होते देवी लक्ष्मीच्या चरणी लीन
Salma Hayek : सलमा हायेक हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपला आणि लक्ष्मीचा फोटो दिला आहे.
हॉलिवूडमध्ये देवाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. तिथे बहुसंख्य लोक ख्रिस्ती असल्यामुळे तिथे येशू यांना मानलं जाण्याचं प्रमाण अधिक आहे. हॉलिवूडच्या कलाकारांना हिंदू धर्माबद्दल कुतूहल असतं. पण त्यापलिकडे आश्चर्याचा सुखद धक्का देणारी बाब हॉलिवूड स्टार सलमा हायेकने शेअर केली आहे.
सलमा ही मेक्सिकन आणि अमेरिकन अभिनेत्री आहे. मेक्सिकेत तिने आपलं करिअर सुरू केलं. तिची वर्णी हॉलिवूडमध्ये लागली ती डेस्परॅडो या चित्रपटाच्या निमित्ताने. त्यानंतर वाईल्ड वाईव्ड वेस्ट, डोग्मा आदी अनेक चित्रपटात ती झळकली. तिला मोठा ब्रेक मिळाला तो 2002 मध्ये. मेक्सिकन चित्रकार फ्रिडा काहलो यांच्या जीवनावर बेतलेल्या चित्रपटात सलमाने फ्रिडाची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं नावही होतं फ्रिडा. या चित्रपटाने तिला ऑस्करचं नामांकन मिळवून दिलं होतं.
सलमा आता चर्चेत यायचं कारण असं तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपला आणि लक्ष्मीचा फोटो दिला आहे. हे दोन फोटो देऊन ती लिहिते, मी जेव्हा जेव्हा मला माझ्या आंतरआत्म्याशी एकरूप व्हायचं असतं तेव्हा मी हा देवी लक्ष्मीचा फोटो समोर ठेवून एकाग्र होते. माझ्या आत खोल पाहू लागते. मी देवी लक्ष्मीचं स्मरण करते. हिंदूंमध्ये देवी लक्ष्मी ही समृद्धतेचं.. संपन्नतेचं, माया, प्रेम यांचं प्रतीक आहे मी जेव्हा केव्हा शांत चित्त असते तेव्हा मला ही देवी आठवते असं ती सांगते. सलमा हायेकची ही पोस्ट भारतात व्हायरल झाली नसती तरच नवल. कारण, एखाद्या मेक्सिकन हॉलिवूड स्टारला जिचा हिंदू धर्माशी त्यातल्या दैवतांशी काही तसा संबंध नसताना मनाच्या शांतीसाठी देवी लक्ष्मीला अशापद्धतीने मनाच्या सिंहासनावर बसवणं याचं कौतुक होतं आहे. Drug Case | अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर, पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाण्यास मनाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement