Saif Ali Khan : ''त्या दिवशी त्याने माझा जीवच घेतला असता'', सैफने सांगितला नाईटक्लबमधील हल्ल्याचा प्रसंग
Saif Ali Khan : एक घटना ही सैफ अली खानच्या जीवावर बेतली असती. त्यानेच दिल्लीत घडलेली घटना सांगितली.
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) बॉलिवूडमध्ये एका ब्रेकनंतर दमदार पुनरागमन केले. 'दिल चाहता है' नंतर सैफने बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली. सैफची बॉलिवूडमधील ही सेकंड इनिंग जोमदार सुरू आहे. काही वृत्तांनुसार, सैफ अली खान हा 'रेस-4' च्या माध्यमातून रेस फ्रेंचाइसीमध्ये कमबॅक करत आहे. मात्र, एक घटना ही सैफ अली खानच्या जीवावर बेतली असती. त्यानेच दिल्लीत घडलेली घटना सांगितली.
दिल्लीतील नाईटक्लब मध्ये घडला प्रसंग...
नेहा धुपियाच्या पॉडकास्ट शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये सैफने स्वतः ही गोष्ट शेअर केली होती. सैफने सांगितले की, “मी दिल्लीतील नाईट क्लबमध्ये बसलो होतो आणि तेवढ्यात एक मुलगा माझ्याकडे आला. त्याने मला विचारले की, कृपया माझ्या मैत्रिणीसोबत डान्स कराल का? मी त्याला नकार दिला मी म्हणालो, मी हे सर्व करत नाही. तर तो म्हणाला, तुला खूप सुंदर चेहरा मिळाला आहे. मला ऐकून आनंद झाला. मला वाटले की तो खरोखर माझी स्तुती करत आहे म्हणून मी हसायला लागलो.
सैफवर केला दोनदा हल्ला...
सैफ अली खानने पुढे सांगितले की, “त्याने माझ्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने माझ्या डोक्यावर व्हिस्कीची बाटलीही मारली. डोक्यातून रक्त येऊ लागले म्हणून मी वॉशरूमला गेलो. तो माझ्या पाठोपाठ वॉशरूममध्ये आला. माझ्या डोक्यातून खूप रक्त येत होते, म्हणून मी माझ्या डोक्यावर पाणी घालू लागलो आणि पाणी ओतताना मी त्या व्यक्तीला म्हणू लागलो, बघ तू काय केलेस. त्याला राग आला. त्याने माझ्यावर पुन्हा सोप डिशने हल्ला केला. तो वेडा होता. मला ठार मारले असते, असे सैफने सांगितले.
'रेस'मध्ये सैफचे कमबॅक
सैफ अली खानसोबत रेस फ्रेंचाइजची सुरुवात झाली होती. पहिल्या दोन्ही भागात त्याने रणवीर सिंह ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून सैफला वगळण्यात आले होते. आता रेस-4 मध्ये सैफ कमबॅक करणार आहे. चित्रपटाचा बेसिक प्लॉट तयार झाला आहे. आता लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असल्याची चर्चा आहे.