Bollywood Movies : काही चित्रपट हे कथानकापेक्षा स्टार कास्ट आणि बजेटमुळे चर्चेत असतात. जवळपास 100 कोटी बजेट असणारे चित्रपटांबद्दल तुम्ही ऐकले असेल पण काही आगामी चित्रपटांचे बजेट हे 300 कोटी आहे. 300 कोटी बजेट असणारे चित्रपट कोणते ते पाहूयात...


आर.आर.आर (R.R.R) 
रिपोर्टनुसार आरआरआक या चित्रपटाचं जवळपास 400 कोटी रूपये बजेट आहे. आरआरआर चित्रपटात अजय देवगण , आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण हे कलाकार महत्वाची भूमिका साकरणार आहेत. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.


पृथ्वीराज (Prithviraj)
अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि सोनू सूद या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या पृथ्वीराज या चित्रपटाचं बजेट 300 कोटी रूपये आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधील अक्षय आणि मनुषीचा लूक पाहून या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. 


'ब्रह्मास्त्र' (Brahmastra)
ब्रह्मास्त्र  हा चित्रपट  9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट अशी स्टार कास्ट असणाऱ्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाचं बजेट 300 कोटी आहे. मौनी रॉय  आणि नागार्जुन  हे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.  या चित्रपटात आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha