Upcoming Movies on OTT: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांची रिलीज डेट जाहीर करत आहेत. तर काही सिनेनिर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवली आहे. आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' आणि अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहेत. 


गंगूबाई काठियावाडी
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा येत्या 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


बच्चन पांडे
सुपरस्टार अक्षय कुमारचा बच्चन पांडे सिनेमा 18 मार्च रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


आरआरआर
'आरआरआर' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. झी 5 वर हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, कोरियन, स्पॅनिश आणि तुर्की भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


बधाई दो 
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा 'बधाई दो' सिनेमा 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नव्हती. 


भीमला नायक
पवन कल्याण आणि राणा डग्गुबतीचा 'भीमला नायक' सिनेमा 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Mumbaikar : विजय सेतुपती आणि विक्रांत मेस्सीचा 'मुंबईकर' सिनेमा मे महिन्यात होणार प्रदर्शित


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित


तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मत न देणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये रजनीकांतसह 'या' सेलिब्रिटींचा समावेश


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha